

डिचोली: डिचोली शहरातील गृहनिर्माण मंडळाच्या कॉम्प्लेक्सची सेप्टिक टाकी ''ओव्हरफ्लो'' झाली असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून, याकडे संबंधितांकडून लक्ष दिले जात नसल्याने वसाहतीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कॉम्प्लेक्सची सेप्टिक टाकी तुंबली आहे, त्या कॉम्प्लेक्समध्ये उत्तर गोव्यातील एका आमदाराचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये त्यांची ये-जा असते; मात्र त्यांचेही या दुर्गंधीकडे लक्ष जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रोगराईची भीती
काही महिन्यांपूर्वी या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन झाले असून, येथे हॉटेल, कार्यालये आदी आस्थापने आहेत. मुख्य रस्त्यापासून २५ ते ३० मीटर अंतरावर असलेल्या या ओव्हरफ्लो झालेल्या सेप्टिक टाकीचा सहजासहजी अंदाज येत नाही. टाकी ओव्हरफ्लो झाल्याने पेव्हर्समधून सांडपाणी झिरपत आहे. सध्या हे सांडपाणी कॉम्प्लेक्सच्या बाजूने उघड्यावर पसरले आहे. त्यामुळे गृहनिर्माण वसाहतीत असह्य दुर्गंधी पसरली आहे.
या सांडपाण्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढली असून, मलेरिया, डेंग्यू आदी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी सेप्टिक टाकी ओव्हरफ्लो झाली आहे, तेथून हाकेच्या अंतरावर चिल्ड्रन्स पार्क आणि शिशुवाटिका आहे. त्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.