Bicholim News : पिळगावात सायली गर्देचे कीर्तन रंगले; रामचंद्र देवस्थानात रामनवमी

Bicholim News : वेगवेगळ्या भागातील मिळून शेकडो रामभक्तांनी पाळण्यातील श्रीरामाचे तसेच मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bicholim News :

डिचोली, श्रीराम जन्मसोहळा आणि अन्य पारंपरिक कार्यक्रमांनिशी गिमोणे-पिळगाव येथील श्री रामचंद्र उर्फ रघुनाथ देवस्थानात रामनवमी मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली.

वेगवेगळ्या भागातील मिळून शेकडो रामभक्तांनी पाळण्यातील श्रीरामाचे तसेच मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले.

सकाळी मंदिरात पूजाअर्चा आदी विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर ११ वा. सायली गर्दे यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. दुपारी १२ वा. ''राम जन्मला गे सखे राम जन्मला'' या गीताच्या तालावर रामजन्म सोहळा झाला. नंतर पाळणागीताच्या तालावर पाळणा सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी रामभक्तांनी गर्दी केली होती.

Bicholim
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

महिला भक्तांची संख्या तर लक्षणीय होती. नंतर आरत्या झाल्या. दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी सांस्कृतिक आदी विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळपर्यंत भाविकांची ये-जा चालू होती. दरम्यान, या उत्सवानिमित्त उद्या (गुरुवारी) देवस्थानात सांस्कृतिक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, बोर्डे, वन आदी भागात रामनवमी परंपरेप्रमाणे साजरी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com