Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Crime News : घराच्या कुंपणात पडलेला नारळ घरमालकीणीच्या सांगण्यावरुन तिच्याकडे दिला. या कारणावरून पंच सदस्य आयेशा मांगोडकर, तिचे पती जमीर मांगोडकर आणि आयेशा यांची सासू झुलेखा मांगोडकर यांनी मला मारहाण केल्याची तक्रार फर्जना हिने पोलिसात दिली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

Crime News :

डिचोली, चार महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला मारहाण करणाऱ्या कारापूर - सर्वणच्या पंच सदस्य आयेशा मांगोडकर यांच्यासह त्यांचे पती आणि सासू यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी वाठादेव येथील महिलांनी केली आहे.

‘बायलांचो साद’ या बिगर सरकारी संस्थेच्या तारा केरकर यांच्या नेतृत्वाखाली वाठादेव येथील महिलांनी आज (शनिवारी) डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली. पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तारा केरकर आणि अन्य महिलांनी केली. फर्जना बेगम या महिलेला मारहाण झाल्याची तक्रार डिचोली पोलिसात नोंद झाली आहे.

मारहाणीची तक्रार

घराच्या कुंपणात पडलेला नारळ घरमालकीणीच्या सांगण्यावरुन तिच्याकडे दिला. या कारणावरून पंच सदस्य आयेशा मांगोडकर, तिचे पती जमीर मांगोडकर आणि आयेशा यांची सासू झुलेखा मांगोडकर यांनी मला मारहाण केल्याची तक्रार फर्जना हिने पोलिसात दिली आहे. ९ रोजी रात्री उशिरा मारहाणीची ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री जमीर यांना ताब्यात घेतले होते.

Crime
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

कठोर कारवाईची मागणी:

चार महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला मारहाण करण्याच्या प्रकरणाचा ‘बायलांचो साद’ या बिगर सरकारी संस्थेच्या तारा केरकर यांनी निषेध केला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीकडून मारहाणीचा प्रकार घडणे हा लांच्छनास्पद प्रकार आहे, असे तारा केरकर म्हणाल्या. याप्रकरणी पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com