Bicholim: काजूची झाडे मोहोराने बहरली, बागायतदारांची लगबग; मात्र धुके, वाढत्या मजुरीने चिंता

Bicholim Agriculture: निसर्गचक्राप्रमाणे आता गोमंतकीयांना काजू हंगामाचे वेध लागले आहेत. डिचोली तालुक्यातील डोंगरमाथे काजूच्या मोहोराने बहरले आहेत.
Bicholim Agriculture
Bicholim AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: निसर्गचक्राप्रमाणे आता गोमंतकीयांना काजू हंगामाचे वेध लागले आहेत. डिचोली तालुक्यातील डोंगरमाथे काजूच्या मोहोराने बहरले आहेत. तालुक्यातील सर्वणसह काही भागात काजूची फळे धरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. हवामान असेच अनुकूल राहिल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काजू व्यवसायाची प्रत्यक्ष लगबग सुरू होईल, असा अंदाज कृषितज्ज्ञांनी वर्तविला आहे.

यंदा मान्सूनोत्तर पाऊस उशिरापर्यंत लांबल्याने सुरुवातीला बागायतदार चिंतेत होते. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे काजू पिकाला उभारी मिळाली आहे. असे असले तरी, अधूनमधून पडणारे दाट धुके बागायतदारांची झोप उडवत आहे. जर धुक्याचे प्रमाण वाढले तर काजूचा मोहोर करपून जाण्याची किंवा गळून पडण्याची शक्यता असते, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

Bicholim Agriculture
Goa PWD: पीडब्ल्यूडीमधील 'ती' पदोन्नती बेकायदेशीर; सरकारला नोटीस, अधिकारांचा गैरवापर केल्‍याचा मुख्य अभियंत्यांवर आरोप

मजुरांच्या तुटवड्यावर ‘ग्रास कटर’चा उताराहंगाम तोंडावर आल्याने सध्या बागायतींमध्ये साफसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, वाढती मजुरी आणि मजुरांची अनुपलब्धता यामुळे बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून अनेक बागायतदार आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

डिचोली : काजू उत्पादनाचे माहेरघर

डिचोली तालुक्‍यातील सर्वण, मये, नार्वे, लाडफे, कारापूर, पिळगाव, धुमासे, कुडचिरे ही गावांमध्‍ये काजू उत्‍पादनाला प्राधान्‍य. तसेच तालुक्यातील बहुतांश डोंगरमाथे काजू लागवडीखाली आहेत. साहजिकच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काजू हा मुख्य कणा आहे.

Bicholim Agriculture
Goa Crime: चोर तर चोर, वर शिरजोर! लुटलेली सोनसाखळी बँकेत गहाण ठेवून घेतलं कर्ज, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मजूर मिळणे कठीण झाल्याने आम्ही घरातील सर्वजण स्वतः बागायतीत उतरलो आहोत. ग्रास कटरच्या साहाय्याने साफसफाईची कामे उरकून घेत आहोत. सध्या मोहोर चांगला आहे, फक्त धुक्याने घात केला नाही म्हणजे मिळवली. - सखाराम गावस, काजू बागायतदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com