Bicholim: डिचोली पालिकेचे होणार 15 प्रभाग, फेररचनेचा नवीन मसुदा तयार; मावळत्या नगरसेवकांना फटका

Bicholim Municipality 15 wards: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता आगामी पालिका निवडणुकीसाठी डिचोली पालिकेच्या प्रभागात वाढ होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
Bicholim Municipality 15 wards
Bicholim Municipality 15 wardsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता आगामी पालिका निवडणुकीसाठी डिचोली पालिकेच्या प्रभागात वाढ होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. डिचोली पालिका ‘ब’ वर्गात येत असल्याने या पालिकेसाठी आता अतिरिक्त एक प्रभाग वाढविण्यात येणार असून आगामी पालिका निवडणुकीसाठी ४ वरून १५ प्रभाग होणार आहेत. नवीन प्रभाग फेररचनेचा मसुदाही निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, नवीन फेररचनेचा दोन ते तीन मावळत्या नगरसेवकांना फटका बसणार आहे. त्यामुळे ते किंचित नाराज आहेत. मात्र, त्यांच्यासमोर अन्य पर्याय नाही.

प्रभाग फेररचनेचा मसुदा पुढीलप्रमाणे :

प्रभाग-१ - व्हाळशी आणि हाउसिंग बोर्ड कॉलनी (व्हाळशी). प्रभाग-२ - महामाया हाउसिंग बोर्ड कॉलनी, साष्टीवाडा आणि मेन रोड बोर्डे. प्रभाग-३ - शांतारामनगर, शारदा कॉलनी आणि राष्ट्रोळी नगर-बोर्डे (पूर्वाश्रमीचा हरिजनवाडा). प्रभाग-४ - डबरावाडा-बोर्डे, गावकरवाडा, चव्हाटा, मधलावाडा आणि कुंभारवाडा-बोर्डे. प्रभाग-५ - नाईकनगर-बोर्डे, नाईकनगर न्यू कॉलनी आणि सुधा कॉलनी. प्रभाग-६ - लाखेरे, पिराचीकोंड आणि मटणवाडी-डिचोली. प्रभाग-७ - वडाचावाडा आणि वरचावाडा-बोर्डे.

Bicholim Municipality 15 wards
Goa traffic issue: राज्यात वाहतुकीचा मास्टर प्लॅन गरजेचा

प्रभाग-८ - भायलीपेठ आणि नागझरवाडा. प्रभाग-९ - बंदरवाडा, व्होडली, रस्ता क्र.-४ (जुने मार्केट), चर्चमागील भाग, वासुदेवनगर, रोलिंग मिल कॉलनी, जोगीवाडा-वासुदेवनगर आणि जोगीवाडा-आयडीसी. प्रभा १० - हिरो होंडा शोरूमजवळील भाग, जामा मशीदी समोरील भाग, तौसिफ सर्विस सेंटरजवळील भाग, हिल व्ह्यू कॉलनी, मेन्स कलेक्शन कॉम्प्लेक्सजवळील भाग, जामा मशिदीमागील भाग आणि फातिमा कॉम्प्लेक्सजवळील भाग.

Bicholim Municipality 15 wards
Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

प्रभाग-११ - आयडीसी, पीडब्ल्यूडी कॉलनी, वालावलीकर कॉलनी, पोलिस क्वार्टर्स, धनगरवाडा आणि स्टार रेसिडेन्सी (मुस्लिमवाडा) जवळील भाग. प्रभाग-१२ - गावकरवाडा-२, धबधबा, कातरवाडा आणि बाराजणनगर. प्रभाग-१३ - गावकरवाडा-१, मांद्रेकरवाडा, बायरो-आल्त आणि अवचितवाडा.

प्रभाग-१४ - भितल्ली पेठ, नवनाथ चेंबर्स, सुंदर पेठ, सोनारपेठ, रस्ता क्र.-१ जवळील भाग, फुटबॉल मैदानाजवळील भाग (रस्ता क्र.-२), टेक्निकल निवास, धेम्पो बिल्डिंग, धेम्पो क्लब, पालिका रस्ता, पोलिस स्थानकासमोरील भाग आणि पाजवाडा. प्रभाग-१५ - मधलावाडा (लामगाव), वयलोवाडो, विश्वासनगर, लामगाव भाट, इलेक्ट्रिसिटी क्वार्टर्स आणि चिमुलवाडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com