Sanquelim Municipal Election 2023: साखळीच्‍या प्रभाग 6 मधील 56 मतदारांची नावेच गायब

एकच खळबळ : मामलेदारांना निवेदन; पालिका निवडणुकीसाठी मोठे षडयंत्र रचल्‍याचा विरोधकांचा आरोप
Praveen Blegan and Saroj Desai along with Alelia voters gathered to request the Mamledars.
Praveen Blegan and Saroj Desai along with Alelia voters gathered to request the Mamledars.Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Election: साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असतानाच प्रभाग सहामधील मतदारयादीतून 56 मतदारांची नावे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संबंधित मतदारांसह उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे.

राजकीय दबावामुळे मतदारांची नावे जाणूनबुजून आणि बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप मतदार आणि उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी प्रवीण ब्लेगन आणि सरोज देसाई यांच्या नेतृत्वाखाली संबंधित मतदारांनी आज मंगळवारी डिचोलीचे मामलेदार तथा साहाय्‍यक निवडणूक अधिकारी राजाराम परब यांची भेट घेऊन मतदानाचा हक्क मिळवून द्यावा अशी मागणी केली.

मतदारांच्या वतीने मामलेदारांना निवेदन देऊन या बेकायदा प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्‍यांनी लावून धरली.

Praveen Blegan and Saroj Desai along with Alelia voters gathered to request the Mamledars.
Bicholim Crime News : डिचोलीतील युवतीचा विनयभंग; पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी

अल्पसंख्यांकावर अन्याय : साखळी पालिकेच्या प्रभाग सहामधील ज्या 56 मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाली आहेत, ते मतदार अल्पसंख्यांक आहेत.

या मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्‍यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मात्र आता या मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब करण्‍यात आलेली आहेत. यादीतून नावे वगळताना आम्हाला कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही, असा या मतदारांचा दावा आहे.

वेळप्रसंगी न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावू

मतदारांची नावे गायब होणे यामागे नक्कीच षडयंत्र आहे. राजकीय दबावातूनच हा प्रकार घडला आहे. अशा प्रकारे मतदारांची मुस्‍कटदाबी करून तुम्‍ही विजयी होऊ शकणार नाही. या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू.

-प्रवीण ब्लेगन, उमेदवार

Praveen Blegan and Saroj Desai along with Alelia voters gathered to request the Mamledars.
Goa Traffic: वाहनचालकांना दिलासा! म्हापसा-पणजी मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार

मतदारांची नावे गायब होणे हा प्रकार अन्यायकारक आहे. मतदारयादीतून मतदारांची नावे गायब होण्यास जबाबदार कोण याची चौकशी व्हायला हवी. तूर्तास वगळलेली नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करून या मतदारांना पालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळायला हवा.

- सरोज देसाई, उमेदवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com