Bicholim News : मये-वायंगिणी पंचायतीत पुन्हा सत्तांतराचे नाट्य

Bicholim News : संगीत खुर्ची दोन वर्षांत चार सरपंच, आमदारांचीही कसरत
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, गेल्या काही वर्षांपासून अस्थिरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मये-वायांगिणी पंचायतीच्या विद्यमान पंचायत मंडळाच्या कार्यकाळातही आता सत्तासंघर्षाचे नाट्य सुरू झाले आहे.

गत पंचायत निवडणुकीनंतर दोन वर्षांचा कार्यकाळ उलटण्याआधीच या पंचायतीला चक्क चार सरपंच लाभले. या संगीत खुर्चीच्या खेळावरून या पंचायतीतील अस्थिरता स्पष्ट होते.

स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांचे या पंचायतीवर वर्चस्व असूनही ही पंचायत ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनाही असंतुष्टांना शांत करण्याची कसरत करावी लागत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत मये-वायंगिणी पंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

Bicholim
Goa Tourism: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 150 टक्के वाढ; यंदा एक कोटी पर्यटकांची नोंद

मात्र, सत्ता स्थापन करतानाच सुरवातीलाच सरपंचपदासाठी रस्सीखेच झाली होती. अखेर सत्ता स्थापनेसाठी अंतर्गत कराराचा तोडगा काढण्याची पाळी आली. त्यानुसार सर्वप्रथम दिलीप शेट यांना सरपंचपदाची संधी देण्यात आली. नंतर सुवर्णा चोडणकर यांची सरपंचपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्यानंतर विद्यानंद कारबोटकर आणि गेल्याच आठवड्यात सीमा आरोंदेकर यांची सरपंचपदी निवड झाली आहे.

अंतर्गत करारानुसार आणखी चार नावे सरपंच पदाच्या शर्यतीत आहेत. करारानुसार सरपंच बदल होत राहिल्यास सत्तासंघर्षाच्या बाबतीत मये-वायंगिणी पंचायत पुन्हा आघाडीवर असणार, यात दुमत नाही.

सर्वण उपसरपंचपदी दिव्या नाईक?

मये मतदारसंघातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदासाठी अखेर निवडणूक निश्चित करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी (ता. २०) निवडणूक होणार असून, त्यासाठी सकाळी १०.३० वा. पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे.

उज्वला कवळेकर यांच्याविरोधात सात पंचसदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव १ एप्रिल रोजी ७ विरुद्ध ० असा संमत झाल्याने त्यांना उपसरपंच पदावरून खाली उतरावे लागले होते. रिक्त उपसरपंच पदासाठी येत्या गुरुवारी निवडणूक होईल. उपसरपंच पदासाठी सध्या सत्ताधारी गटातील दिव्या नाईक यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com