Bicholim: माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला सुरूवात; वादाच्या विळख्यात अडकलेला उत्सव यंदातरी निर्विघ्न होणार का?

Maye Temple Festival: तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या प्रसिद्ध कळसोत्सव आजपासून (४ मार्च) सुरू झाला आहे.
Maye Temple Festival
Maye Temple FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या प्रसिद्ध कळसोत्सव आजपासून (४ मार्च) सुरू झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील प्रसिद्ध कळसोत्सव यंदा सुरळीतपणे साजरा होणार की नाही, त्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं आहे.

प्राप्त विश्वसनीय माहितीनुसार कळसोत्सव साजरा करण्याबाबतीत परस्पर विरोधी गटात एकवाक्यता झाली नसल्याचे समजते. त्यामुळे हा उत्सव अनिश्चिततेच्या सावटाखाली असल्याचे समजते. तरीदेखील कळसोत्सव साजरा करण्यासाठी देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्याची तयारी देवस्थान समितीने ठेवली आहे.

यंदा हा उत्सव सुरळीतपणे साजरा व्हावा. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूने गेल्यावर्षी माल्याची आणि रेड्याची जत्रा सुरळीतपणे पार पडल्याने यंदा कळसोत्सवाबाबत भक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Maye Temple Festival
Goa RERA: गोवा 'रेरा'चा दणका! रजिस्ट्रेशन न केल्यामुळे पणजीतील बिल्डरला 5 लाखांचा दंड

‘सुवर्णमध्य’ नाही!

कळसोत्सव सुरळीत साजरा व्हावा. यासाठी गेल्या आठवड्यापासून प्रशासकीय स्तरावर देवस्थान समिती व विरोधी गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्याची माहिती आहे. मात्र, ‘सुवर्णमध्य’ निघाला नसल्याचे आहे.

कळसोत्सव परंपरेप्रमाणे साजरा करावा, अशी मागणी विरोधी गटाने लावून धरली आहे. त्यामुळे वादाची शक्यता गृहित धरून देवीचा कळस मंदिरातून बाहेर काढताना पोलिस बंदोबस्त तैनात होईल,असे समजते.

Maye Temple Festival
Goa News: बी.एल.संतोष यांनी मंत्र्यांसह आमदारांची घेतली भेट; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

कळसोत्सव वादाच्या सावटाखाली ?

मानापमानावरून मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव काही वर्षांपासून वादात अडकलेला आहे. गेल्यावर्षी तर हा उत्सव मध्येच रद्द करण्याची पाळी आली होती. गावकरवाडा येथील श्री माया केळबाय मंदिरातून कळस बाहेर काढल्यानंतर नाईक व इतर समाजातील लोकांकडून केळबाय मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कळस रोखला होता.

तरी नंतर माल्याची व रेड्याची जत्रा सुरळीत साजरी झाली. त्यामुळे यंदा कळसोत्सव होणार, अशी आशा मयेतील भक्तांना असली, तरी दुसऱ्या बाजूने हा उत्सव सुरळीत साजरा होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com