

डिचोली: वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावत असले, तरी डिचोली शहरात बेशिस्तपणे वाहने पार्क करण्याचे प्रकार घडत आहेत. असाच बेशिस्तपणाचा अनुभव शनिवारी रात्री डिचोलीच्या बाजारात पाहायला मिळाला.
रस्त्यावरच कार उभी करून ठेवल्याने बाजारातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कार बाजूला काढेपर्यंत रस्त्यावर वाहने अडकून पडली.
वाहतूक पोलिस शिरगाव व अन्य ठिकाणी बंदोबस्तात व्यस्त असल्याने बाजार परिसरात नियंत्रणाचा अभाव होता. नेहमी येथील वाहतुकीवर पोलिस नियंत्रण ठेवत असले, तरीदेखील काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात किंवा बेशिस्तपणे वाहने उभी करतात, असे वारंवार दिसून येते.
चालकच जबाबदार
वाहतूक कोंडी होण्यास वाहनचालकच जबाबदार असतात. वाहतूक पोलिसांना दोष देणे योग्य नाही. वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर यांनी केली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.