Bicholim Market : डिचोली बाजारात ‘मानकुराद’ झाला गोड; दर ग्राहकांच्या आवाक्यात

Bicholim Market : डिचोलीच्या बाजारात अजूनही स्थानिक ‘मानकुराद’ उपलब्ध होत असून, सध्या बाजारात मानकुरादसह अन्य आंब्यांचा घमघमाट सुटत आहे.
Mankurad Mango
Mankurad MangoDainik Gomantak

Bicholim Market :

बोरी, डिचोली, विविध बाजारपेठांमध्ये भाव खात असलेल्या ‘मानकुराद’ आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे.

त्यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेत मानकुराद काहीसा स्वस्त झाला आहे. मानकुरादचे दर आवाक्यात असल्याने सध्यातरी डिचोलीत ग्राहकांसाठी ‘मानकुराद’ गोड झाला आहे.

डिचोलीच्या बाजारात अजूनही स्थानिक ‘मानकुराद’ उपलब्ध होत असून, सध्या बाजारात मानकुरादसह अन्य आंब्यांचा घमघमाट सुटत आहे. मानकुरादसह हापूस, पायरी, मालगेस या जातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी येत असून ‘मानकुराद’ अजूनही भाव खात आहे.

डिचोलीच्या बाजारात सध्या मये, नार्वे, कुडचिरे आदी स्थानिक बागायतींमध्ये पिकणारा ‘मानकुराद’ विक्रीस उपलब्ध होत आहे. पुढील जेमतेम सात-आठ दिवसांपर्यंत ‘मानकुराद’ बाजारात येणार आहे. हापूस, पायरी आदी आंब्यांना बाजारात मागणी असली, तरी ‘मानकुराद’ अंतिम टप्प्यात असल्यामुळे खवय्यांचा सध्या खरेदीकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.

‘मानकुराद’ आंब्यांचा हंगाम आता लवकरच संपणार आहे. सध्या झाडावर आंबे नाहीत. ज्या बागायतदारांनी पिकत घातले आहेत. तेच आंबे आता बाजारात येत आहेत, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली.

Mankurad Mango
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

अन्य आंबेही झाले स्वस्त

वीस दिवसांपूर्वी म्हणजेच शिरगावच्या लईराई जत्रेच्या काळात ‘मानकुराद’चा भाव वाढला होता. कमी आवक असल्याने ‘मानकुराद’चा दर दीड हजार रुपये डझन असा होता. आता डिचोलीच्या बाजारात चांगल्या प्रतीचा मानकुराद ६०० ते ७०० रुपये डझन या दराने विकण्यात येत आहे. ४०० रुपये डझन असे हापूस, पायरी, मालगेस या आंब्यांचे दर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com