Ferry Boat: सारमानस ­फेरीसेवा बेभरवशाची!

प्रवाशांची गैरसोय : नव्या अद्ययावत फेरीबोटींची मागणी
Ferry Boat
Ferry BoatGomantak Digital Team

डिचोली : सारमानस-टोंक जलमार्गावर फेरीसेवेची समस्या नित्याचीच बनली असून ही सेवा बेभरंवशाची ठरत आहे. या जलमार्गावरील फेरीसेवेत अधूनमधून खंड पडत असल्याने प्रवासी अडकून पडत असतात. दोन दिवसांपूर्वी गेल्या बुधवारी पुन्हा एकदा या जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाईट अनुभव आला.

फेरीसेवा नादुरूस्त झाल्याने त्यांना साखळीहून डिचोलीला जावे लागते किंवा साखळीमार्गेमाशेलकडे यावे लागते. त्यामुळे वेळत पोचता येत नाही, शिवाय इंधनाचाही जादा खर्च करावा लागतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित या मार्गावर फेरीसेवा अद्ययावत करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Ferry Boat
Bicholim : धबधबा खाण खंदकातील पाणीउपसा सुरू

एक फेरीबोट दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने सारमानस-टोंक जलमार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. फेरीबोट नांगरून ठेवल्याने दोन्ही बाजूच्या फेरीधक्क्यावर प्रवासी अडकून पडले, अशी माहिती अश्वेक गिमोणकर आदी नियमित प्रवाशांनी देऊन या जलमार्गावरील फेरीसेवेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी केली.

वेगवेगळ्या कारणावरून सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवा दिवसेंदिवस वादाचा विषय बनत आहे. सारमानस-टोंक जलमार्गावरुन हजारो प्रवासी नियमित ये-जा करीत असतात. मात्र बेभरंवशाच्या फेरीसेवेमुळे प्रवासी बऱ्याचदा अडकून पडतात.

Ferry Boat
Bicholim Fish Market : परप्रांतीय सुकी मासळीविक्रेत्‍यांची संख्‍या वाढली

ओहोटीच्यावेळी तर सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवेत व्यत्यय येत असल्याने या जलमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओहोटीच्यावेळी या जलमार्गावर मध्यभागी भाट पडते.

अशावेळी फेरीसेवा सुरु राहिली तर मध्यभागी फेरीबोटी अडकून पडतात. त्यामुळे ओहोटीच्यावेळी फेरीसेवा बंद ठेवण्यात येते. त्यातच अधूनमधून एक फेरीबोट नादुरुस्त राहिली तर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. या गैरसोयीमुळे मात्र प्रवाशांना नियोजित स्थळ गाठणे अशक्य होत असते.

Ferry Boat
Bicholim : पिळगावात ‘गुणदर्शन’ सोहळा उत्साहात; मुलांच्या कलाविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

सारमानस-टोंक जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन्ही फेरीबोटी जुन्या आहेत, त्यामुळे या फेरीबोटी नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असतात. या जलमार्गावर नवीन फेरीबोटी सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. यापूर्वी आपण ही मागणी पंचायत तसेच नदी परिवहन खात्याकडे केलेली आहे. नवीन फेरीबोटी सुरू केल्यास ही समस्या सुटण्यास मदत होणार. पंचायतीने या मागणीचा पाठपुरावा करावा

- अनिल नाईक, माजी पंच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com