Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Bicholim: रविवारपासून सक्रिय झालेल्या पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले.
Bicholim Heavy Rain
Bicholim Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: रविवारपासून सक्रिय झालेल्या पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात एका सरकारी कार्यालय इमारतीसह दोन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, आर्थिक नुकसानी वगळता अन्य कोणताही अनर्थ घडला नाही.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मुळगाव येथील डब्ल्यूआरडीच्या इमारतीवर झाड कोसळून छप्पराची मोडतोड झाली. लिडींग फायर फायटर व्ही. एम. गाड यांच्या नेतृत्वाखालील दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. दुसऱ्या एका घटनेत सायंकाळी सुर्ल येथील पंचायतीजवळील शेडवर फणसाचे झाड कोसळले.

Bicholim Heavy Rain
Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

सोमवारी सकाळी आणि दुपारी दमदार पाऊस बरसल्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर वाढला. रात्री उशिरापर्यंत पर्जन्यवृष्टी सुरू होती. आजच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. बहुतेक ठिकाणी रस्ते तसेच सखल भागात जलमय स्थिती निर्माण झाली होती.

Bicholim Heavy Rain
Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

नद्यांचे पाणीही वाढले होते. पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. आता शेतीची प्रलंबित कामे करण्यास मिळणार अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com