Bicholim Health Center : डिचोली आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव ; रुग्णांची गैरसोय

रुग्णांची परवड : शस्त्रक्रिया तज्ज्ञांसह डॉक्टर उपलब्ध करण्याची काँग्रेसची मागणी
Bicholim Health Centers ambulance
Bicholim Health Centers ambulanceDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Health Centers डिचोली, येथील सामाजिक आरोग्य केंद्रात प्रमुख सुविधांचा अभाव असल्याची माहिती समोर आली आहे. शस्त्रक्रिया आदी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने या केंद्रात येणाऱ्या काही रुग्णांची मोठी गैरसोय होत असून बऱ्याचदा त्यांची परवड होत आहे.

तशी तक्रारही रुग्णांकडून होत आहे. दरम्यान, आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रातील गैरसोयीबद्दल एक निवेदन आरोग्याधिकाऱ्यांना दिले आहे. आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा विनाविलंब पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तालुक्यातील साखळी आरोग्य केंद्राला सामाजिक इस्पितळाचा दर्जा मिळाल्यापासून या इस्पितळात सुसज्ज आणि आवश्यक साधनसुविधा उपलब्ध आहेत.

तरीदेखील तालुक्यातीलच नव्हे, तर अस्नोडा आदी भागातील मिळून बहुतांश रुग्ण डिचोली आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. या आरोग्य केंद्रात दरदिवशी दोनशे ते तीनशे रुग्ण तपासणीसाठी येत असतात.

दहा वर्षांपूर्वी ३० मे २०१३ रोजी डिचोली आरोग्य केंद्राचे नवीन भव्य इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आदी प्रमुख सुविधांची कमतरता आहे.

दरम्यान, महेश म्हांबरे आणि मनोज नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर यांची भेट घेऊन आरोग्य केंद्रातील गैरसोयी त्यांच्यासमोर मांडल्या.

कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदनही दिले. केंद्रातील प्रमुख गैरसोयींबद्दल आरोग्य खात्याला प्रस्ताव दिला असल्याचे डॉ. साळकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Bicholim Health Centers ambulance
Goa Live Updates: संजना प्रभुगावकरला आणखी एक पदक

भंगार अड्ड्याचे स्वरूप

अलीकडेच डिचोलीत घडलेल्या भीषण अपघातावेळी १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या बाजूने आरोग्य केंद्र इमारतीच्या मागच्या बाजूला रुग्णवाहिकांसह चार ‘स्क्रॅप’ वाहने पडून आहेत.

या प्रकाराबाबत लोक आश्चर्य व्यक्त करतात. हे आरोग्य केंद्र की ‘भंगार’ वाहनांचा अड्डा? असा प्रश्न काँग्रेसचे महेश म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे. डिचोली आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा पुरविण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा

डॉक्टर आदी सुविधा उपलब्ध करून आरोग्य केंद्राचे ‘आरोग्य’ सुधारा, अशी मागणी डिचोली गट काँग्रेसने केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही काँग्रेसचे सरचिटणीस महेश म्हांबरे आणि युवा गटाध्यक्ष मनोज नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Bicholim Health Centers ambulance
National Games Goa 2023: मयांक चाफेकरची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी! ऑलिम्पिक पदकाचा निर्धार

शस्त्रक्रिया तज्ज्ञांची आवश्यकता

आरोग्य केंद्राची इमारत बाहेरून चकाचक वाटत असली, तरी केंद्रात अनेक समस्या आहेत. शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ आदी प्रमुख डॉक्टरांची कमतरता आहे.

दंतचिकित्सा सेवा नियमित उपलब्ध नाही. क्ष-किरण आणि रक्तगट तपासणी विभागातही गैरसोयी असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया तज्ज्ञांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त आरोग्य केंद्रात आले असता, स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com