Goa Live Updates: संजना प्रभुगावकरला आणखी एक पदक

Goa Breaking News: पणजी, मडगाव, म्हापसा तसेच इतर महत्वाच्या शहरातील ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates | Goa Breaking News
Goa Live Updates | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on
Sanjana Prabhugaokar
Sanjana Prabhugaokar Dainik Gomantak

संजना प्रभुगावकरला आणखी एक पदक

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या संजना प्रभुगावकर हिला आणखी एक पदक. 200 मीटर बॅक स्ट्रोक शर्यतीत 2 मिनिटे 33.64 सेकंद वेळेसह ब्राँझपदक. यापूर्वी याच शर्यतीत 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

गोव्यातील 99 टक्के गुन्हे परप्रांतीयांमुळेच - सभापती रमेश तवडकर

गोव्यातील 99 टक्के गुन्हे परप्रांतीयांमुळे घडत आहेत, असा आरोप गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी केला. गोवा ओळखला गेला पाहिजे, फेणीसारख्या अमृतासाठी. गोव्यात येणाऱ्या कुणीही लोकांकडून फेणी मागितली पाहिजे, ड्रग्ज नाही, असेही ते म्हणाले.

श्रृंगी बांदेकर
श्रृंगी बांदेकर Dainik Gomantak

गोव्याच्या श्रृंगी बांदेकरला स्विमिंगमध्ये कांस्यपदक

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या श्रृंगी राजेश बांदेकर हीने स्विमिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. तिने महिलांच्या 400 मीटर मेडली प्रकारात 5.13.09 अशी वेळ नोंदवत या पदकावर मोहोर उमटवली.

काणकोणमध्ये 6 ते 10 डिसेंबरदरम्यान होणार लोकोत्सव

गोव्याची अभिजात लोककला आणि लोकसंस्कृती दर्शविणारा लोकोत्सव यावर्षी 6 ते 10 डिसेंबर दरम्यान काणकोण तालुक्यात साजरा केला जाणार.

गोवा मानवाधिकार आयोग पुनर्जीवित करण्याची मागणी गोवा फॉरवर्डचीच : दुर्गादास

गोवा मानवाधिकार आयोग गोवा सरकारने पुन्हा गठित केल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून बंद असलेला हा आयोग पुन्हा सुरू करण्याबाबत गोवा फॉरवर्डनेच मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते याकडे या पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी आज लक्ष वेधले.

अध्यक्षाची कालमर्यादा संपल्याने आठ महिन्यांपूर्वी हा आयोग बंद झाला होतं. काल सरकारने नव्याने या आयोगावर निवृत्त न्यायाधीश डेसमंड डिसोझा आणि न्या. प्रमोद कामत यांची नियुक्ती केली आहे.

हाऊसिंग बोर्ड घोगळ येथे टुरिस्ट व्हॅनला आग

हाऊसिंग बोर्ड घोगळ येथे आज (मंगळवार) एका टुरिस्ट व्हॅनला आग लागण्याचा प्रकार घडला आहे. यावेळी आगीची चाहूल लागताच प्रसंगवधान राखून सर्व प्रवासी गाडीमधून सहीसलामत बचावले.

यात एकंदरीत प्रवासी होते हा टेम्पो घोगळ येथे पोचल्यानंतर या वाहनाच्या इंजिनने अचानक पेट घेतला. त्यामुळे यात असलेल्या प्रवाशांनी प्रसंगवधन राखून बाहेर धाव घेतली त्या मुळे ते सर्वजण बचावले.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना सुमारे २०.८३ कोटीहून अधिक रक्कमेला गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) सालसेत येथील मायरॉन रॉड्रिग्ज (५३ वर्षे) व दिपाली परब (४० वर्षे) यांच्याविरुद्ध विश्‍वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानी स्वतःला स्टॉक ब्रोकर व गुंतवणूक असल्याचे गुंतवणूकदारांना भासवून पैसे घेतले होते.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रदर्शनीय खेळ असलेल्या गतका खेळाला सुरवात, दिल्ली संघाची यजमान गोव्यावर मात. गतका खेळ उत्तर भारतात लोकप्रिय आहे.

gatka martial art
gatka martial artDainik Gomantak

गोव्याचा 'गोल्डन बॉय' बाबू गावकर म्हणतो, आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही राज्यासाठी मेडल आणणार

सुवर्णपदक मिळाल्यानंतर आमदार सुभाष फळदेसाई यांनी बाबू गावकरला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले. यानंतर त्याच्या कौतुकासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबू गावकर म्हणाला की, आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझी निवड झाली आहे. माझ्या गोव्यासाठी मी तिथेही जीवाचे रान करत पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेन.

म्हापशात 80 हजारांचे अमलीपदार्थ जप्त

म्हापसा पोलिसांनी पश्चिम बंगालच्या युवकाकडून ८० हजारचा ड्रग्स (गांजा) जप्त केला. जरजीस आलम असे संशयिताचे नाव असून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोच्या प्राथमिक फेरीत गोव्याने हरियाणाच्या संघावर 2-0 ने मात करत विजय मिळविला.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील टिप्पणीप्रकरण; गुन्हा रद्द करण्यासाठी फादर बोलमॅक्स कोर्टात

चर्चमधील प्रवचनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीप्रकरणी वास्को पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कॅथोलिक धर्मगुरू बोलमॅक्स फिडेलिस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन हा गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे. खंडपीठाने वास्को पोलिसांना नोटीस बजावून ही सुनावणी 11 डिसेंबरला ठेवली आहे.

सागरी आव्हानांसाठी बहुराष्ट्रीय सहयोग हवा : राजनाथ सिंह

हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अमलीपदार्थांची तस्करी, अती मासेमारी आणि समुद्रावरील वाणिज्य स्वातंत्र्य यांसारख्या सामायिक सागरी आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी हिंदी महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोगी फ्रेमवर्क स्थापन करावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

बहुराज्यीय 'सेक्स्टॉर्शन' प्रकरणाचा पडदा फाश; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात सुरू असलेल्या बहुराज्यीय सेक्स्टॉर्शन प्रकरणाचा कळंगुट पोलिसांनी पडदा फाश केला. यामध्ये पोलिसांनी कथित सूत्रधार हरीश हेमनानीला अटक केली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक अस्लम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश हेमनानी याने 3 महिला साथीदारांचा वापर करून खंडणीसाठी बनावट बलात्कार प्रकरणात 3 व्यावसायिकांना फसवले.

गोवा ते अहमदाबाद विमानसेवेत वाढ! आता सातही दिवस करता येणार प्रवास

मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा ते अहमदाबाद अशी आणखी विमानसेवा सुरू करणार असल्याची विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. सदर विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. विस्तारा एयरलाइन्स कंपनीतर्फे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याचे सातही दिवस गोवा ते अहमदाबाद असा प्रवास करता येणार आहे.

पणजीतील फोडाफोडीबाबत समाजमाध्यमांवर नाराजीचा सूर

पणजी, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) या महामंडळातर्फे पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू झालेली आहेत. त्यासाठी पदपथावर खोदकाम करताना दुकाने किंवा रहिवाशांच्या निवासाकडे जाण्यासाठी असणाऱ्या मार्गांबाबत विचार केलेला नाही.

त्यामुळे पणजीतील जागृत नागरिकांनी समाजमाध्यमांतून छायाचित्रांसह या कामांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

येथील नागरीक अरूण पै यांनी समाजमाध्यमात काही छायाचित्रे अपलोड करीत सात दिवसांपासून आपल्या घरासमोर चर खोदकाम केलेले आहे.

त्यात कोणी पडण्याची वाट पाहिली जात आहे. सर्वत्र तिच परिस्थिती असून, कोणतेही नियोजन नाही, यंत्रणा नाही, देखरेख नाही, सरकार झोपले आहे. कोणी तरी अगोदरच स्मार्ट झाले आहेत, त्यामुळेच शहरामध्ये कोणतीही त्यांना अडचण येत नसल्याने ते आनंद घेत आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लावला आहे.

मांडवी तीरावरील चार कॅसिनोंवर 'ईडी'चे छापे

मांडवी नदीच्‍या पात्रात ठाण मांडून बसलेल्‍या, परंतु वादग्रस्‍तही बनलेल्‍या चार कॅसिनोंवर सोमवारी सक्‍त वसुली संचालनालयाने छापे टाकले.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जे कॅसिनो ऑनलाईन व्‍यवहार चालवत होते, त्‍यांच्‍यावर प्रामुख्‍याने हे छापे टाकण्‍यात आले. हा व्‍यवहार कित्‍येक हजार कोटींचा असल्‍याची माहितीही समोर आली आहे.

व्याघ्र प्रकल्पप्रकरणी न्यायालयात अवमान अर्ज; बुधवारी सुनावणी

म्हादई अभयारण्यासह आजूबाजूचे क्षेत्र व्याघ्र संरक्षित प्रकल्प घोषित करून त्याची अधिसूचना काढण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत संपल्याने गोवा फाउंडेशनने यासंदर्भात अवमान अर्ज सादर केला.

त्याचा उल्लेख मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आज केला असता त्यावरील सुनावणी येत्या बुधवारी (१ नोव्हेंबर) ठेवली आहे.

सरकारने व्याघ्र संरक्षित प्रकल्प अधिसूचित करण्यासाठी मुदतवाढ द्यावी यासाठी २० ऑक्टोबरला उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, त्यावर सुनावणी घेण्यासाठी सरकारतर्फे आजही उल्लेख करण्यात आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com