Bicholim News : कळसोत्सवाची भाविकांना उत्सुकता; गुरुवारपासून उत्सव

Bicholim News : मयेवासीयांसह तमाम भक्तगणांचे लक्ष
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मये येथील श्री माया केळबाय देवस्थानचा प्रसिद्ध कळसोत्सव यंदा येत्या गुरुवारपासून (ता.१४) साजरा होणार आहे.

मात्र गेल्यावर्षीसह त्यापूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहता, यंदा कळसोत्सव साजरा होणार की नाही, त्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. निदान यंदा तरी सुरळीतपणे कळसोत्सव साजरा होणार का, त्याकडे मयेवासीयांसह देवीच्या तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिले असून, भक्तांची उत्सुकताही वाढलेली आहे.

गेल्यावर्षी कळस मंदिराबाहेर काढताना सुरवातीस झालेला गोंधळ आणि किरकोळ तणावानंतर कळसोत्सव सुरळीतपणे साजरा होत असतानाच, उत्सवाला तणावाचे गालबोट लागले. परिणामी कळसोत्सव अर्ध्यावरच रद्द करण्यात आला.

त्यामुळे यंदाच्या कळसोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कळसोत्सव कोणत्याही वादाशिवाय सुरळीतपणे साजरा व्हावा. देवीची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी,असे प्रत्येक भक्ताला मनोमनी वाटत आहे. भाविकांच्या इच्छेनुसार यंदा कळसोत्सवाला सुरवात झाली, तरी वाद टाळण्यासाठी कळस मंदिराबाहेर काढताना पोलिस बंदोबस्ताची मदत घ्यावी लागणार. हे स्पष्ट आहे.

Bicholim
Goa News: शिरोडकर कुलस्वामिनी घुमटीतील फंडपेटी फोडली; कर्नाटकातील संशयित चोरट्यास अटक

हरवळेत तणावपूर्व शांतता

गोमंतकातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानातही यंदा महाशिवरात्री उत्सवावेळी अधिकाराच्या मुद्द्यावरुन वाद उफाळून आला आहे. पोलिस बंदोबस्तात महाशिवरात्री साजरी झाली होती. परिणामी पारंपरिक दिवजोत्सव आणि रथोत्सवात खंड पडला. रुदेश्वर देवस्थानात यंदाही महाशिवरात्रीला भक्तांचा महापूर लोटला होता. मात्र ‘माना’च्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाल्याने यंदा या पवित्र स्थळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सध्या हरवळेतील वाद शमला आहे. तरीही वाद कोणत्याही क्षणी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.डिचोली, गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मये येथील श्री माया केळबाय देवस्थानचा प्रसिद्ध कळसोत्सव यंदा येत्या गुरुवारपासून (ता.१४) साजरा होणार आहे.

मात्र गेल्यावर्षीसह त्यापूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहता, यंदा कळसोत्सव साजरा होणार की नाही, त्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. निदान यंदा तरी सुरळीतपणे कळसोत्सव साजरा होणार का, त्याकडे मयेवासीयांसह देवीच्या तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिले असून, भक्तांची उत्सुकताही वाढलेली आहे.

गेल्यावर्षी कळस मंदिराबाहेर काढताना सुरवातीस झालेला गोंधळ आणि किरकोळ तणावानंतर कळसोत्सव सुरळीतपणे साजरा होत असतानाच, उत्सवाला तणावाचे गालबोट लागले. परिणामी कळसोत्सव अर्ध्यावरच रद्द करण्यात आला.

त्यामुळे यंदाच्या कळसोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कळसोत्सव कोणत्याही वादाशिवाय सुरळीतपणे साजरा व्हावा. देवीची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी,असे प्रत्येक भक्ताला मनोमनी वाटत आहे. भाविकांच्या इच्छेनुसार यंदा कळसोत्सवाला सुरवात झाली, तरी वाद टाळण्यासाठी कळस मंदिराबाहेर काढताना पोलिस बंदोबस्ताची मदत घ्यावी लागणार. हे स्पष्ट आहे.

वादाची पार्श्‍वभूमी अशी : अधिकाराच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून मये येथील कळसोत्सव वादात अडकला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून २०१९ साली कळसोत्सवासह माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव देवस्थान प्रशासकांकडून स्थगित करण्यात आले होते.

२०२० सालीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शेवटच्या क्षणी कळसोत्सव निलंबित केला होता. मात्र नंतर न्यायालयाने परब समाजाला कळसोत्सव साजरा करण्याची मोकळीक दिल्यानंतर त्यावर्षी एकाच दिवशी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा झाला होता. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षी मात्र किरकोळ अपवाद वगळता पोलिस बंदोबस्तात कळसोत्सव साजरा झाला.

गतवर्षी कळसोत्सव सुरू असतानाच अधिकाराच्या मुद्द्यावरुन वाद उद्‍भवला. स्थिती तणावग्रस्त होताच उत्सव अर्ध्यावरच रद्द करण्यात आला. पोलिस बंदोबस्तात देवीचा कळस मंदिरात नेण्यात आला. कळसोत्सव रद्द केल्यानंतर माल्याची जत्रा आणि रेड्याच्या जत्रेवरही परिणाम झाला होता. २०१९ पूर्वीही मध्यंतरी कळसोत्सवावेळी वाद निर्माण झाला होता.

Bicholim
Ribandar Road closure: मोठी आणि महत्वाची बातमी! दिवजा सर्कल ते ओल्ड गोवा मार्ग 50 दिवस राहणार बंद

कळस अबोलीच्या फुलांनी सजवतात

श्री महामाया देवीच्या मंदिरात देवीचा कळस अबोलीच्या फुलांनी सजविण्यात येतो. मयेतील हा कळसोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठी गर्दी करीत असतात. भाविकांनी या उत्सवाची मोठी उत्सकताही असते. मात्र वादात सापडलेल्या या कळसोत्सवाला यंदा कोणतेही गालबोट लागू नये, अशी प्रार्थना भाविक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com