सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेले आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे राजकीय भवितव्य उज्वल असून डिचोलीच्या विकासासाठी त्यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिली.
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी जनतेची नाडी ओळखल्यामुळेच ते पहिल्या प्रयत्नातच आमदार बनले. जनतेला काय हवे त्याची त्यांना पूर्ण जाण आहे. जनतेसाठी ते सतत धडपडत असतात, असे गोरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा वाढदिवस आज मुळगाव येथे ‘शेट्ये व्हिजन’ संकुलात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर,
केदार नाईक आणि राजेश फळदेसाई यांच्यासह आमदार डॉ. शेट्ये यांच्या सहचारिणी भाग्यश्री शेट्ये उपस्थित होत्या. या मान्यवरांसह हजारो शुभचिंतकांच्या उपस्थितीत आमदार डॉ. शेट्ये यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला.
अनेक कामांचा शुभारंभ
वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डिचोली येथे फुटसाल प्रकल्प, रोटरी गार्डन, अडवलपाल येथे सामाजिक सभागृह आदी मिळून मतदारसंघात २० कोटींहून अधिक रुपयांच्या खर्चाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
वैद्यकीय उपकरण बँक
आमदार डॉ. शेट्ये अध्यक्ष असलेल्या शिक्षा व्हिजनतर्फे वैद्यकीय उपकरण बँक उघडण्यात आली आहे. या बँकेसह सुसज्ज अशा आमदार कार्यालयाचे अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शुभेच्छांचा वर्षाव
आमदार डॉ. शेट्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुळगाव येथे गर्दी उसळली होती. तत्पूर्वी क्रीडामंत्री गोविंद गावडे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कृष्णा साळकर आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष हजर राहून आमदार डॉ. शेट्ये यांना शुभेच्छा दिल्या.
विविध राजकीय नेते, विविध खात्याचे अधिकारी, विविध पंचायतींचे सरपंच, पंच यांच्यासह नगरसेवक, भाजप कार्यकर्ते, समर्थक आणि शुभचिंतकांनी उपस्थित राहून आमदार डॉ. शेट्ये यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.