Bicholim: धोकादायक 'जीना' जमीनदोस्त होणार, डिचोलीत पुढील आठवड्यात कारवाई; गाळेधारकांनी रिकामे केले गाळे

Bicholim Dangerous Staircase: बाजारातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या ‘त्या’ जीन्याची अखेर शेवटची घटका भरली आहे.
Dangerous building in Bicholim marked for demolition by authorities
Bicholim dangerous building Demolition Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : बाजारातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या ‘त्या’ जीन्याची अखेर शेवटची घटका भरली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार असून, पुढील आठवड्यात हा जीना जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिका हाती घेणार आहे.

जीन्याखालील गाळेधारकांनी आपल्या गाळ्यांतील माल स्वखर्चाने हलविला असून, काही स्टॉलधारकांनी बाजार परिसरात अन्यत्र तात्पुरती व्यवस्था केली आहे. संबंधित गाळ्यांची वीज जोडणीदेखील खंडित करण्यात आली आहे. पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात पाडकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

Dangerous building in Bicholim marked for demolition by authorities
Goa Road Accidents: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! 5 वर्षांत 4,657 अपघातांत 1,011 जणांचा मृत्यू; सर्वाधिक बळी 45 ते 60 वयोगटातील

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पालिकेने जीन्याखालील चार स्टॉलसह नऊ गाळे हटविण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, स्टॉलधारकांच्या स्थलांतराबाबत तोडगा न निघाल्याने ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, सततच्या पावसामुळे जिन्याची अवस्था अधिकच धोकादायक बनल्याने तो तातडीने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत गाळेधारकांची बैठक झाली. या बैठकीला पालिकेचे प्रशासक, मुख्य अधिकारी तसेच अभियंते उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गाळेधारकांनीही पालिकेच्या निर्णयाला सहमती दर्शविली.

Dangerous building in Bicholim marked for demolition by authorities
Goa Forest Rights Claims: राज्‍यातील 30 टक्‍केच वन हक्‍क दावे निकाली, 1,901 दावे फेटाळले; 1,270 जणांना सनदांचे वितरण

नऊपैकी चार स्टॉलधारकांना गणपती पूजन मंडपाजवळ तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित कायमस्वरूपी गाळेधारकांना जीन्याचे काम पूर्ण होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा लागणार असून, त्यांनी गाळ्यातील माल घरी हलविला आहे. आता जीन्याचे काम लवकर पूर्ण होऊन पुन्हा व्यवसाय पूर्ववत सुरू होण्याची प्रतीक्षा सर्व गाळेधारकांना लागून राहिली आहे.

लोखंडी जीना उभारणार

सध्याचा काँक्रीटचा जीना पाडल्यानंतर त्याठिकाणी आधुनिक लोखंडी जीना उभारण्यात येणार आहे. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सर्व गाळेधारकांना पूर्वीच्याच जागेवर पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल, अशी ग्वाही पालिकेकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com