Bicholim : देवीची पेठ बंदिस्त गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही देवीचा ‘पण’ अपूर्ण राहण्याची चिंता

मयेतील माल्याच्या जत्रेबाबत साशंकता
Mayem Malyachi jatra
Mayem Malyachi jatraGomantak Digital Team
Published on
Updated on

Bicholim : मये येथील प्रसिद्ध ‘माल्याची जत्रा’ यंदा सुरळीतपणे साजरी होणार, असे संकेत मिळाले असतानाच, या जत्रेबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. येत्या बुधवारी (ता.२९) जत्रा साजरी करण्याचा दिवस आहे. मात्र, तत्पूर्वीच वाद निर्माण झाला आहे.

श्री केळबाई देवीचे मंदिर बंद केल्याने आज (सोमवारी) देवीची पेठ पारंपरिक ठिकाणी म्हणजेच चव्हाट्यावर नेता आली नाही. त्यामुळे या जत्रेतील पुढील सर्व प्रमुख विधी अडकून पडले आहेत. याप्रकरणी शिष्टाई करण्यास प्रशासकीय यंत्रणाही कमी पडली आहे. परिणामी यंदा जत्रा साजरी होण्याची शक्यता मावळली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माले पेटविण्याचा देवीचा ‘पण’ अपूर्ण राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Mayem Malyachi jatra
Worship Of God: देवपूजा करण्याची योग्य दिशा कोणती माहितीय?

मुळगावची पेठ मयेत

माल्याच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मुळगावच्या श्री केळबाई देवीच्या पेठेचे (सोमवारी) मध्यरात्री मयेत आगमन झाले. ही पेठ मयेत येताच पारंपरिक विधी पार पडल्यानंतर मयेतील श्री केळबाई देवीच्या पेठेसह मुळगावची पेठ चव्हाटा येथे पारंपरिक ठिकाणी नेऊन त्याठिकाणी स्थानापन्न करतात. मात्र, मयेतील देवीचे देऊळ बंद असल्याने मुळगावची पेठ परस्पर चव्हाट्यावर नेण्यात आली. चव्हाट्यावर पेठ नेताच पेठ उघडून आतील देवता दर्शनासाठी ठेवतात. यंदा मुळगावची पेठ सायंकाळपर्यंत बंद अवस्थेत होती.

मयेतील पेठ बंदिस्त

मयेतील श्री केळबाई देवीच्या मंदिराचा बंद दरवाजा उघडण्यात न आल्याने पुढील सर्व विधी अडकून पडले. काल रात्री मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद करण्यात आला होता. दैनंदिन पूजेसाठी दुपारपर्यंत पुजारीही मंदिरात आले नाहीत. परिणामी मयेतील देवीची पेठ मंदिरातच बंद राहिली. हा दरवाजा कोणी बंद केला, याबाबत संभ्रम असला, तरी देवस्थान समितीने दरवाजा बंद केल्याचा दावा नाईक गावकर, गावस, गोसावी आदींनी केला आहे.

Mayem Malyachi jatra
God worship: देवपूजा आणि आपण

गेल्यावर्षीही वाद

गेल्यावर्षीही मयेतील श्री केळबाई देवीची पेठ मंदिराबाहेर काढण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने शिष्टाई केल्यानंतर सायंकाळी पेठ मंदिराबाहेर काढून पारंपरिक ठिकाणी नेण्यात आली होती. गेल्या वर्षी माल्याच्या जत्रेतील बहुतेक सर्व रितीरिवाज पार पडले होते. मात्र, शेवटच्या क्षणी माल्याच्या अधिकारावरून वाद निर्माण झाल्याने अखेर ‘माले’ पेटलेच नव्हते आणि देवीचा ‘पण’ ही पूर्ण झाला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com