Christmas 2023 : डिचोलीत 'येशू' जन्म सजावटीचे आकर्षण

Christmas 2023 : ख्रिस्ती बांधवांनी घरांवर रंगीबेरंगी नक्षत्रे लावली असून, विद्युत रोषणाई आणि गोठा आदी सजावटही केली आहे.
Christmas 2023 in goa
Christmas 2023 in goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Christmas 2023 : डिचोली, ख्रिस्ती बांधवांचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या नाताळ सणाचे डिचोलीत उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरात सर्वत्र ‘ख्रिसमस’ची धूम पसरली असून नववर्षाचे स्वागत केल्यानंतरच नाताळचा जल्लोष मावळणार आहे.

नाताळाच्या उत्साहात अन्य धर्मीय लोकही सहभागी होत आहेत.नाताळच्या पूर्वदिनी रविवारी (ता.२४) रात्री शहरातील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम झाल्यानंतर मध्यरात्री घंटानाद झाला. नंतर ख्रिश्‍चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत ‘ख्रिसमस’चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

‘ख्रिसमस’निमित्त अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई तसेच आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांनी घरांवर रंगीबेरंगी नक्षत्रे लावली असून, विद्युत रोषणाई आणि गोठा आदी सजावटही केली आहे. घरोघरी गोडधोड पदार्थही बनविण्यात आले आहेत. नाताळ साहित्याची अजूनही खरेदी चालू आहे.

Christmas 2023 in goa
Centre Scheme in Goa: केंद्रातील योजना राबवणारे गोवा पहिले राज्य

पोलिसांनी जपली परंपरा

अवरलेडी चर्चसमोर यंदा येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित आकर्षक असा इको फ्रेंडली देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

डिचोली पोलिसांनीही नाताळ सणाची परंपरा जपली असून, यंदाही पोलिस ठाण्यात गोठ्याची सजावट केली आहे. याशिवाय ख्रिस्ती बांधवांनीही घरोघरी सजावट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com