Centre Scheme in Goa: केंद्रातील योजना राबवणारे गोवा पहिले राज्य

Centre Scheme in Goa: राज्यातील योजना गोव्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आज राज्यातील स्वयंपूर्ण मित्र करीत आहेत.
Centre Scheme
Centre Scheme Dainik Gomantak
Published on
Updated on

Centre Scheme : साखळी, केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’, ‘हर घर शौचालय’, ‘हर घर वीज’ यासह सुमारे दहा योजना यशस्वीपणे राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

केंद्रातील योजनांबरोबरच राज्यातील योजना गोव्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आज राज्यातील स्वयंपूर्ण मित्र करीत आहेत.

त्यामुळे आज राज्यातील लोक स्वयंपूर्णतेकडे वळत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे विकसित भारत यात्रेच्या शुभारंभप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्ष रश्मी, केंद्र सरकारचे अतिरिक्त कमिशनर पवन कुमार, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, विनंती पार्सेकर, सिध्दी प्रभू, निकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई, अतुल पै बीर आदी उपस्थित होते.

Centre Scheme
Goa Wildlife: पर्यावरणीय क्षेत्र- वन्यजीव- मानव; साहचर्य राखण्याची नितांत गरज

केंद्रातील भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिलांचा सन्मान राखून ‘तीन तलाक’ बंदीचा कायदा आणला. सरकारी योजना सर्वधर्मीयांसाठी देताना ‘हर घर नल से जल’, ‘हर घर शौचालय’ या सुविधा केवळ महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत अमलात आणल्या.

युवांसाठी कौशल्य विकासाचे मार्गदर्शन व स्वावलंबनासाठी विविध योजना गेल्या दहा वर्षांमध्ये आणलेल्या आहेत.

शेतकऱ्यांना प्रथमच या देशात सन्मानाचे जीवन जगण्यास देताना आज त्यांना विनाशुल्क किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे.

या सर्वांबरोबर गरीब कल्याणाचा नारा लावताना गरिबांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन धान्य पुरविण्याचा निर्णय म्हणेजेच चौफेर मानवी जीवनाच्या विकासाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

स्वयंपूर्ण योजनेतून गोवा स्वयंपूर्णतेकडे

स्वयंपूर्ण गोवा या योजनेअंतर्गत आज राज्यातील सर्व पंचायती व नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या स्वयंपूर्ण मित्रांच्या मदतीने गोवा स्वयंपूर्णतेकडे वळत आहे.

अनेक युवक व पारंपरिक व्यावसायिकांनी सध्या सरकारच्या योजनांचा लाभ घेत आपल्या व्यवसायात वृध्दी आणली आहे.

दरवर्षी दसरा आणि दिवाळीत राज्यात १०० टक्के झेंडूची फुले परराज्यातून येत होती. परंतु यावर्षी राज्यातील बाजारांमध्ये ४० टक्के झेंडूंची फुले ही गोव्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वनिधी योजनेत साखळी पालिका प्रथम

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या सर्व योजनाची साखळी नगरपालिका गंभीरपणे अंमलबजावणी करत आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजनेत साखळी नगरपालिका गोव्यात प्रथम क्रमांकावर आली असून संपूर्ण देशातील ११ हजार नगरपालिकांमध्ये ११४ वा क्रमांक साखळी पालिकेने पटकावला आहे.

तसेच विश्वकर्मा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ३००, आभा योजनेअंतर्गत ८०० जणांची नोंदणी नगरपालिकेने केली आहे, असे यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com