

डिचोली: डिचोलीच्या चौपदरी बगलमार्गावरील धोकादायक अवस्थेत असलेली ‘ती’ दरड दिवसेंदिवस खचत असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. वेळीच ही दरड हटवली नाही, तर ती कोसळून एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही वाहनचालकांसह जागृत नागरिक व्यक्त करीत असून त्वरित दरड हटविण्याबाबत कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
नाईकनगर परिसरातील या बगलमार्गावर दोन ठिकाणी दरड यापूर्वी कोसळली आहे.. त्यामुळे बगलमार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी ही दरड हटवून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहे.
गेल्यावर्षी भर पावसात जुलै महिन्यात वाठादेव-व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर एक भलामोठा दगड वजा दरड खचली होती. नाईकनगर परिसरात व्हाळशीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूने ही दरड खचली आहे. खचलेली ही भली मोठी दरड सुदैवाने रेलिंगला अडकून राहिल्याने त्यावेळी संभाव्य अनर्थ टळला होता. ही दरड खचल्यास सात महिने होत आले आहेत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने दरड काढण्याकडे अजून तरी दुर्लक्ष झाले आहेत.
जून २०२४ मध्ये या बगलमार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेचच याच बगलमार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर धोका ओळखून दरड कोसळलेल्या परिसरात कडा कापून बगलमार्ग सुरक्षित करण्यात आला.
दरड कोसळलेल्या भागात जोड रस्ताही बांधण्यात आला आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी बगलमार्गाच्या दिशेने खचलेली आणि कोसळण्याच्या वाटेवर असलेली दरड मात्र अजून तशीच आहे. पावसाळ्यापूर्वी ही दरड काढली नाही, तर पावसाळ्यात ती कोसळण्याचा अधिक धोका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.