Bhuipal Water : भुईपालमधील पाण्याचा प्रश्न सुटला; नागरिकांतून समाधान

Bhuipal Water : आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना यश
Bhuipal
Bhuipal Dainik Gomantak

Bhuipal Water :

पिसुर्ले, सालेली, भुईपाल या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बऱ्याच ठिकाणी भगदाडे पडल्याने या भागातील पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घेऊन जलवाहिनी दुरुस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. या दोन्ही गावांना दाबोस पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

Bhuipal
Goa News : परंपरेनुसार साऱ्यांना मान; अधिकार भंडारी ज्ञातीकडे,भंडारी समाज बैठकीत ठराव

पाणीपुरवठा विभागाच्यावतीने भुईपाल परिसरातील विविध वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जलकुंभ तपासणी नाक्याजवळ, तर एक भुईपाल गावाजवळील डोंगरावर आहे.

या जलकुंभात दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी खेचून भुईपाल येथील तपासणी नाक्याजवळील जलकुंभांमध्ये साठवले जाते व ते पाणी डोंगरावर असलेल्या जलकुंभात सोडून या परिसरातील विविध वाड्यांवरील नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, परंतु या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बऱ्याच ठिकाणी भगदाडे पडल्याने उंच तसेच बऱ्याच लांब असलेल्या घरांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या.

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते.

मोर्लेतील प्रकल्प ठरणार वरदान

मोर्ले येथे होणाऱ्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून मोर्ले, पिसुर्ले, होंडा व पर्ये या चार पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांचे काम एक वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

खंडित विजेमुळे व्यत्यय

सत्तरी तालुक्यातील सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्प हा महत्त्वाचा दुवा बनला आहे, परंतु मोठ्या संख्येने होणाऱ्या नळजोडणी, काही वेळा पाणी शुद्धीकरण यंत्रणेमध्ये होणारे बिघाड किंवा दाबोस व भुईपाल येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होत आहे.

त्यामुळे कधी कधी ठरल्या वेळेवर पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही, असे भुईपाल येथील पाणीपुरवठा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून समजले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com