Bhuipal Road : भुईपाल येथील तीन रस्त्यांचे काम पूर्ण, एक रस्ता बाकी

Bhuipal Road : पंच मोटेंकडून पाठपुरावा : आमदार राणे यांचे सहकार्य तसे भेडशेवाडा येथील पावसाळ्यातील पूर समस्या निवारण्यासाठी नाल्यांवर संरक्षक भिंत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Bhuipal Road
Bhuipal RoadDainik Gomantak

Bhuipal Road :

पिसुर्ले, होंडा पंचायत प्रभाग ९ मधील भुईपाल भागातील तीन अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अंतर्गत भागात पक्क्या रस्त्यांची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.

स्थानिक पंच स्मिता मोटे यांनी याची दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सहकार्याने या भागातील चार रस्त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठवले होते. त्यापैकी तीन रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून एका रस्त्यांचे काम लवकर मार्गी लागणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.

प्रभाग ९ मध्ये धनगरवाडा, भेडशेवाडा, डोबवाडा व चोडणकरनगर या परिसराचा समावेश आहे.

Bhuipal Road
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

क्रीडा मैदान विकासाचा प्रस्ताव :

भेडशेवाडा येथील मैदानाचा विकास करण्यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. त्यामुळे भुईपालच्या दोन्ही प्रभागातील क्रीडापटूंची सोय होणार आहे.

तसे भेडशेवाडा येथील पावसाळ्यातील पूर समस्या निवारण्यासाठी नाल्यांवर संरक्षक भिंत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जलस्रोत खात्याने याबाबत सर्वेक्षण केले आहे. तसेच भेडशेवाडा व डोबवाडा येथील गटारांची व्यवस्था सुधारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. भुईपाल चेकपोस्ट ते जानू ताटे घर व होंडा वाळपई रस्ता ते धाकटू दवणे घरापर्यंतचा रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केले आहेत, अशी माहिती पंच स्मिता मोटे यांनी दिली.

Bhuipal Road
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

चोडणकरनगरमधील रस्त्यांचे काम लवकरच

चोडणकरनगर भागातील रस्त्यांच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. या वाड्यावरील एकूण पाच अंतर्गत रस्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

येत्या काळात या कामांनाही मंजुरी मिळून रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असे पंच स्मिता मोटे यांनी सांगितले. तसेच प्रभागातील सर्व वाड्यांवर पथदिवे बसविण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे मोटे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com