Goa Land Grab Case: जमीन हडप घोटाळ्यात आणखी एकास अटक; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

'एसआयटी'ची कारवाई; हणजुणे येथे केला होता व्यवहार
Goa Land Grab Case
Goa Land Grab CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Land Grabbing Case: गोव्यातील जमिन हडप घोटाळ्यात SIT ने आणखी एकास अटक केली आहे. देवानंद प्रभाकर कवळेकर असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

हणजुणे येथील सर्व्हे क्रमांक 444/8 या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रे बनवली होती. या बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची मालकी बदलण्यात आली होती. या प्रकरणात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसआयटीकडून केला जात आहे.

मार्च महिन्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला होता. अँटोनियो सॅव्हियो डी'कोस्टा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

Goa Land Grab Case
Goa Fire in Forest: डोंगराला लागलेल्या आगींमागे बिल्डर लॉबी; आमदार विरेश बोरकर यांचा आरोप

दरम्यान, मॅथ्यू अँटोरियो डिसोझा (इंडस्ट्रियल अॅश्युरन्स बिल्डिंग, दुसरा मजला, V, N. रोड, चर्च गेट, मुंबई), देवानंद प्रभाकर कवळेकर, फेलिक्स नोरोन्हा (कर्नाल, हरियाणा), सीमा चौधरी (कर्नाल, हरियाणा), अल्कॅन्ट्रो थिओफिलिओ डी' सौझा, जून डिसोझा, आर्चीबाल्ड झेवियर डिसोझा, तेरेझा डिसोझा, मॅक्सी मीना डिसोझा, टीना डिसूझा उर्फ टीना अँटोइनेट, वेरोनिका डिसोझा उर्फ वेरोनिका ऑलिव्हिया डिसोझा, रोहन रगनाथ हरमलकर आणि इतरांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. मालकाची फसवणूक करण्यासाठी मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार केली.

दरम्यान, नावट कागदपत्रे करून जमिनी लाटण्याच्या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रूजली आहेत. यापुर्वी मार्च महिन्यात असेच प्रकरण समोर आले होते. बार्देश तालुक्यातील पर्रा या गावातील जमीन हडप केली होती. त्या प्रकरणात ब्रँका कॅसियानो डिनीझ आणि रायसन रॉड्रिग्ज या दोघांविरोधात एसआयटीने गुन्हा दाखल केला होता.

त्यांनी 1996 या सालचे फेक सेल डीड कागदपत्र करून घेतले. पर्रा गावातील सर्व्हे नंबर 37/3 आणि 37/6 या जमिनीच्या खरेदी आणि हस्तांतरणाची बनावट कागदपत्रे तयार केली. आणि संबंधित जमीनीचा व्यवहार 6 ऑगस्ट 2021 रोजी केला. आणि हीच बनावट कागदपत्रे फेरफारसाठी बार्देशातील मामलेदार कार्यालयाला खरी कागदपत्रे म्हणून सादर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com