Bhoma village : सरकारचा कुटिल डाव यशस्वी होऊ देणार नाही; भोमवासीय आक्रमक

चौपदरी महामार्गाला विरोध
Bhoma villagers
Bhoma villagersDainik Gomantak
Published on
Updated on

Bhoma villagers oppose NH : भोम गावचे अस्तित्व संपवण्याचा सरकारचा कुटिल डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार करीत भोमवासीयांनी चौपदरी महामार्गाला आज कडाडून विरोध केला. यावेळी त्यांनी उद्या (ता. १) पणजीतील आझाद मैदानावर दुपारी साडेतीन वाजता जमून आपली कैफियत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचा निश्चय केला आहे.

भोम येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेत माजी सरपंच व विद्यमान पंच सुनील जल्मी तसेच संजय नाईक व इतरांनी आपले विचार मांडले.

Bhoma villagers
Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूरची धग विधानसभेत; 7 आमदार 24 तास निलंबित

फर्मागुढी ते बाणस्तारीपर्यंत व पुढे पणजीपर्यंतच्या चौपदरी महामार्गात भोम गावचा बळी देण्याचा सरकारचा डाव असून आत्तापर्यंत कुठलीच सरकारी यंत्रणा याबाबतीत स्पष्टपणे सांगू इच्छित नाही हे स्पष्ट झाले असून आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

चौपदरी महामार्ग बांधताना भोम गावातील मंदिर तसेच देवाचे पेड आणि येथील बहुतांश घरे पाडण्याचा डाव आखण्यात आला असून वर्तमानपत्रातील सरकारी अधिसूचनेत ते स्पष्ट झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Bhoma villagers
CM Pramod Sawant : अनुदानित शाळा व्यवस्थापने पालकांकडून पैसे का घेतात?

चौपदरी महामार्ग बांधकाम करताना बिल्डर लॉबीचे हित डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारची रचना महामार्ग खात्याने आखली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आता संघटित होऊनच हा लढा तीव्र करण्यात येईल असा निर्णय या सभेत झाला.

‘चलो पणजी’चा नारा

भोमवासीयांनी ‘चलो पणजी’चा नारा देत आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यासाठी आज दुपारी साडेतीन वाजता पणजीतील आझाद मैदानावर जमणार आहेत. यावेळी भोमवासीय आपली कैफियत मांडणार असून गेल्या रविवारी भोम ग्रामसभेत पंचायत मंडळानेही आपला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com