Bethora: चिंताजनक! बेतोडा नाल्यामध्ये घातक रसायन; पाणी प्रदूषित, मासे आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीसह रोगराईची भीती

Bethora Pollution: बेतोडा येथील ‘लाईफलाईन'' म्हणून ओळखला जाणारा नाला प्रदूषित झाला असून या नाल्यात बिनधास्तपणे घातक रसायन सोडण्याचे प्रकार होत आहेत.
Bethora pollution news
Bethora pollution newsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: बेतोडा येथील ‘लाईफलाईन'' म्हणून ओळखला जाणारा नाला प्रदूषित झाला असून या नाल्यात बिनधास्तपणे घातक रसायन सोडण्याचे प्रकार होत आहेत. या रसायनामुळे नाल्याचे पाणी काळे होऊन मासे मृतावस्थेत आढळले आहेत.

भयंकर रोगराई पसरण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित खात्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या नाल्यात घातक रसायन अधूनमधून सोडण्याचे प्रकार होतात. येथील काही उत्पादक कंपन्यांवर नागरिकांचा संशय आहे.

शिवाय दत्तगड येथील शौचालयांची घाण नाल्यात सोडण्याबरोबर काही कँटीनचेही दूषित पाणी नाल्यात सोडले जात असल्याचा संशय आहे. नाल्यातील प्रदूषित पाण्याचा फटका लगतच्या बागायतींना बसत असून त्यामुळे झाडे मरत आहेत. वास्तविक हे पाणी बेतोडा तसेच नागझरी - कुर्टीतील लोक आंघोळ करणे, कपडे धुणे तसेच इतर कामासाठी वापरतात. मात्र रसायन नाल्यात सोडल्याने या पाण्याचा वापर करणे धोक्याचे ठरले आहे.

Bethora pollution news
Bethora: '..आम्हाला आंघोळ करणेही अशक्य'! बेतोडा भागात पाणीबाणी; टंचाईमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

या नाल्याच्या दुर्दशेबाबत आणि घातक रसायन सोडण्याच्या प्रकाराची तक्रार महेश पणशीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. जलस्त्रोत स्वच्छ साफ ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधितांना आदेश द्यावेत. गेल्या वर्षी पंचसदस्य हरेश नाईक, महेश पणशीकर तसेच संदीप पारकर यांनी या नाल्यातील घाणीसंबंधी आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारी सूत्रे हलली; पण नंतर काहीच झाले नाही.

Bethora pollution news
Bethora: झुडपे कापण्यासाठी मागितली परवानगी, प्रत्यक्षात प्लॉट पाडून विकले; बेतोड्यात गैरकृत्यांना ऊत

सुटीच्या दिवसांत नाल्यात घाण...!

सुटीच्या दिवसांत बेतोड्यातील या नाल्यात घाण सोडली जाते. विशेषतः शनिवारी व रविवारी तसेच अन्य सुटीच्या दिवसांत नाल्यात रसायन की घाण सोडली जाते, त्याचा आधी तपास लावायला हवा. पाणी काळे होत असून त्याला दुर्गंधीही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बेतोडा नाल्यात रसायन सोडण्यात येत आहे, त्यात आता घाण मिसळते की अन्य काही त्याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाने घ्यावा. नाल्याशेजारी असलेल्या एका कंपनीकडून हे घातक रसायन सोडले जात असून सातत्याने तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असून त्यासाठी सह्यांची मोहीम सध्या सुरू आहे.

महेश पणशीकर (नागरिक, कुर्टी)

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याप्रकरणी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. इतर संबंधित सरकारी खात्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या नाल्याची त्वरित तपासणी करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. ही पाहणी करताना स्थानिकांना विश्‍वासात घ्यावे.

संदीप पारकर (आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते, खांडेपार)

बेतोडा पंचायतीच्या हद्दीत या नाल्यात घाण सोडली जात आहे, त्याची दखल पंचायत घेणार असून पुढील कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही करावी. या नाल्याच्या पाण्यावर बागायती जगतात, काही लोक हे पाणी वापरतात, त्यामुळे धोका वाढला आहे.

मधू खांडेपारकर (सरपंच, बेतोडा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com