Betalbatim Panchayat: बाहेरच्या गुंतवणूकदारांना गावांत 'नो एंट्री'! बेताळभाटी ग्रामसभेची स्पष्ट शब्दांत चेतावणी

Betalbatim Viral Sign Boards: गावातील आवश्यक संसाधने संपुष्टात आलेली आहेत. प्रमोटर, डेव्हलपर्स व बिल्डर यांनी आपल्या जोखमीवर येथे जमीन खरेदी करावी असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे
Betalbatim Gram Sabha
Betalbatim Gram Sabha Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दक्षिण गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य बेताळभाटी गावाने एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतलाय. बेताळभाटी येथील ग्रामस्थांनी गावाबाहेरच्या गुंतवणूकदारांना स्पष्ट शब्दांत बेताळभाटी गावात गुंतवणूक न करण्याचा इशारा दिला आहे. रविवार (दि.२७) रोजी झालेल्या ग्रामसभेत सदस्यांनी एकत्रितपणे एक चेतावणी फलक गावात लावलाय, ज्यामध्ये बाहेरच्या लोकांना गुंतवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बेताळभाटी गावाच्या सीमेवर उभारलेले सूचनाफलक सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरले आहेत. गावातील आवश्यक संसाधने संपुष्टात आलेली आहेत. प्रमोटर, डेव्हलपर्स व बिल्डर यांनी आपल्या जोखमीवर येथे जमीन खरेदी करावी असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे.

Betalbatim Gram Sabha
Anjuna Gramsabha: हणजूण ग्रामसभेत ड्रेनेज आणि अवैध बांधकामांवरून गोंधळ; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

ग्रामसभेच्या ठरावानुसार हे फलक उभारण्यात आल्याचे सरपंच अँथनी फर्नांडिस यांनी ग्रामसभेत सांगितले. विविध स्तरातून या फलकांना पाठिंबाही मिळत आहे. इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारे फलक उभारून गावात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध दर्शवावा, तसेच गावातील जमिनींचे संरक्षण व संवर्धन करावे, असेही संदेश व्हायरल होत आहेत.

गेल्या काही काळापासून बेताळभाटीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प वाढत आहेत. अनेकजण जमिनी खरेदी करून या गावात मोठे गृहप्रकल्प उभारत आहेत, परिणामी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि मूलभूत सुविधांवर मोठा ताण येत असल्याचं असे ग्रामस्थ म्हणालेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामसभेमध्ये सखोल चर्चा झाली आणि या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

ग्रामस्थांनी सांगितले की, या विकासामुळे गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. विजेचा पुरवठा अनियमित झाला आहे आणि मर्यादित असलेली जमीन संसाधनेही वेगाने कमी होत आहेत. "आमच्या गावाची नैसर्गिक सुंदरता आणि शांतता धोक्यात आली आहे. बाहेरचे लोक येत आहेत आणि मोठे प्रकल्प उभे करत आहेत. यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, कचऱ्याची समस्या वाढत आहे." असे ग्रामस्थांचा म्हणणे आहे.

गावातील लोकांचं सध्या आवश्यक वीज पुरवठा होत नाहीये. ग्रामस्थांना यापुढे आणखीन समस्यांना तोंड द्यावे लागू नये यासाठी अशा सूचनाफलकांची मागणी ग्रामसभेत करण्यात आली आणि यानुसार ग्रामसभेत सूचना फलकांची उभारणी केली गेलीये. गावात सध्या कचऱ्याचा विषय देखील गंभीर आहे. नव्याने येणाऱ्यांना पंचायतीकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जाऊ शकत नाही हे सांगण्यासाठीच सूचना फलक उभारले असल्याचं सरपंच अँथोनी फर्नांडिस म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com