Bendurde Pole Four Lane Road: महामार्गाला अडथळा, 1500 झाडे हटवणार; बेंदूर्डे-पोळे चारपदरी महामार्गाचे काम ऑक्टोबरपासून

Bendurde Pole Road Construction: बेंदूर्डे ते पोळे दरम्यानच्या २२ किलोमीटर लांबीच्या चारपदरी रस्त्याच्या बांधणीसाठी अडथळा ठरणारी झाडे हटवण्यास सुरुवात झाली आहे.
Bendurde Pole Road Construction
Bendurde Pole Four Lane RoadDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: बेंदूर्डे ते पोळे दरम्यानच्या २२ किलोमीटर लांबीच्या चारपदरी रस्त्याच्या बांधणीसाठी अडथळा ठरणारी झाडे हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेंदूर्डे ते करमल घाटपर्यंतची सुमारे दीड हजार झाडे हटवण्यात येणार आहेत.

कापण्यात येणाऱ्या वृक्षांमध्ये जास्तीत जास्त निलगिरीची झाडे आहेत. त्याशिवाय सागवान आणि अन्य वृक्षांचाही समावेश आहे. मडगावहून येताना डाव्या बाजूला असलेली झाडे हटवण्यात येत आहेत. यावेळी वन अधिकारी उपस्थित होते. चारपदरी रस्त्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

Bendurde Pole Road Construction
Goa University: नवे नेतृत्व, नव्या आकांक्षा अन् नव्या दिशा! गोवा विद्यापीठाला मिळणार गोमंतकीय कुलगुरु; शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची नवी संधी

हरियाणा येथील कुलूवाला कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने ५९४.१८ कोटी रुपयांना ही निविदा स्वीकारली आहे. बेंदूर्डे ते बगल रस्ता हे अंतर १४.४९ किलोमीटर आहे, तर त्यानंतर माशे ते पोळेपर्यंतचे अंतर ७.६१ किलोमीटर आहे. त्यासाठी एकूण २ लाख ९२ हजार ३०८ चौरस मीटर जमीन संपादन करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे.

काणकोणहून अर्ध्या तासात मडगाव

या महामार्गामुळे नागरिकांना काणकोणहून अर्ध्या तासात मडगाव, तर एका तासात पणजीला जाणे शक्य होईल. तसेच, अपघातांचे प्रमाणही कमी होणार असल्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

Bendurde Pole Road Construction
Goa Politics: पक्षांतराची हॅट्‌ट्रिक पुन्हा शक्य, सरदेसाईंची काँग्रेसवर टीका; युतीचा विशेष फायदा नाही!

काणकोण ते मडगाव एकोणीस बसथांबे

दोन वर्षांत या चारपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे काणकोण ते मडगाव प्रवास सुलभ होणार आहे. या मार्गावर एकोणीस बसथांबे आणि प्रसाधनगृहे असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com