Panaji News : भाई मोये निःस्वार्थी, धडपड्या कार्यकर्ता : रवींद्र आमोणकर

Panaji News : ‘गोसासे’तर्फे विनायक नाईक स्मृती पुरस्कार प्रदान
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, मगोचे निष्ठावंत सेवक, सार्वजनिक क्षेत्रातील धडपड्या कार्यकर्ता, जाज्वल्य मराठीप्रेमी अशा रूपात मी भाई मोये यांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यांनी निःस्वार्थपणे कार्य केले आहे,असे रवींद्र आमोणकर यांनी सांगितले.

विनायक नाईक यांच्या सारखा तर नीतिमान राजकारणी, कार्यकर्ता दुर्मिळच, त्यांच्या सोबत भाईंनी काम केले,असेही ते म्हणाले.

‘मगो’चे माजी आमदार, जाज्वल्य मराठीप्रेमी कार्यकर्ते विनायक नाईक यांच्यासोबत मी काम केले आणि त्यांच्या नावाचा मला पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करून भाई मोये यांनी, आपण सार्वजनिक जीवनात काम करताना कसलीच अपेक्षा बाळगली नाही. सामाजिक कार्यातून मिळणारे सुख समाधान मोठे असते, असे मत येथे व्यक्त केले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाई मोये यांना विनायक वि. नाईक स्मृती पुरस्कार, त्यांच्या कुटुंबीयांच्या सौजन्याने प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र आमोणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी भाई मोये बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख वक्ते ज्येष्ठ कवी तथा आयएमबी चे अध्यक्ष दशरथ परब, विनायक नाईक यांचे सुपूत्र पराग नाईक, मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस उपस्थित होते.

त्याकाळी विद्यालये नव्हती तिथे विनायक नाईक यांनी विद्यालये सुरू केली. मराठी राजभाषा चळवळ, सहकार, साहित्य या क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली. नीतिमान राजकारणी म्हणून लौकीक मिळवला.

पराग नाईक म्हणाले, आमच्या बाबांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. शिक्षण संस्था, मराठी चळवळीत त्यांनी समर्पितवृत्तीने काम केले. रमेश वंसकर यांनी स्वागत केले. राजमोहन शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले, विठ्ठल गावस यांनी आभार मानले.

Panaji
Go First कंपनीच्या विमानात बिघाड, दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या फ्लाईटची जयपूरला लॅंडींग

कोकणी व मराठी या दोन्ही भाषांना राजभाषेचे स्थान मिळावे, ही माझी मागणी होती व आजही त्याच्याशी मी ठाम आहे. माझे गुरू हे नाटक सर्वत्र गाजले व ते पणजी आकाशवाणी मराठी म्हणून करायला नकार दिला तेव्हा माधव गडकरींनी मोर्चा नेला व मला गाडीच्या वर बसविले होते. तेव्हा मराठी विरोधकांनी फेकलेला दगड मला डोक्याला दगड लागला होता . ही आठवण आजही ताजी आहे.

-रवींद्र आमोणकर,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com