
Benaulim Village Water Stream
सासष्टी: बाणावली हा सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यालगतचा एक प्रमुख गाव आहे. हा गाव नैसर्गिकरीत्या परिपूर्ण असून या गावात अनेक झरे वाहताना दिसत आहेत. काही झरे बांधकामांमुळे बुजलेले आहेत तर काही विकासकामाच्या नावांखाली नष्ट केलेले आहेत. असाच एक बुजलेल्या अवस्थेत असलेला झरा पुनर्जीवित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.
हा झरा पुनर्जीवित करण्यासाठी समाजकार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी बरेच कष्ट घेतलेले आहेत. आपण स्वखर्चाने हा झरा सुरू केला आहे, त्यासाठी आपल्याला एक लाख रुपये तरी खर्च येणार आहे. जर जलस्रोत खात्यातर्फे हे काम केले असते तर त्यांनी ५ लाख रुपये खर्च दाखविला असता, असेही वॉरन आलेमाव यांनी सांगितले.
रॉक फर्नांडिस म्हणाले की, आपण पंचायतीला झऱ्याचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक पत्रे दिली होती; पण पंचायतीने ते गांभीर्याने घेतले नाही. आपण सामाजिक कार्यकर्ते वॉरेन आलेमाव यांना पुढाकार घेऊन खोदकाम सुरू करण्याची विनंती केली होती.
हा झरा ४० ते ५० वर्षांपूर्वी वाहत होता. नंतर तो बुझून गेला होता.दरम्यान, पंचसदस्य एझलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, गावातील झरे पुनर्जीवित करण्यासाठी पंचायतीने ठराव घेतलेला आहे. हा झराही योग्य पद्धतीने बांधून काढला जाईल.
गेरोन फर्नांडिस या शेतकऱ्याने सांगितले की, येथील सर्वात जुन्या झऱ्यांपैकी हा एक झरा आहे. त्यांच्या बालपणी ते या झऱ्याचे पाणी पीत आणि शेतीच्या कामांसाठीही वापरत असत; परंतु कालांतराने तो झरा कचराकुंडीत नष्ट झाला. जे शेतकरी या झऱ्याचे साक्षीदार आहेत त्यांना या झऱ्यात पाणी पाहून खूप आनंद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.