
Venzy Viegas Controversy
मडगाव: ऐन अस्मिता दिनी कोलवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची तुलना गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी केल्याने सासष्टी तालुक्यातून त्यांच्यावर टीकेचा झोड उठत आहे.
काल व्हिएगश यांनी मुख्यमंत्री सावंत यांची तुलना बांदोडकर यांच्याशी करताना हेही मुख्यमंत्री विरोधी मतदारसंघांत विकासकामे करताना भेदभाव करत नाहीत, असे म्हटले होते. यावर भाष्य करताना यापूर्वी हेच आमदार भाजप सरकारवर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत होते, आता असे काय झाले की त्यांना वेगळा साक्षात्कार झाला असा सवाल केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी जर चांगले काम केले असेल, तर त्यांची स्तुती करण्यास काहीच हरकत नाही, पण ‘ओपिनियन पोल’च्या दिवशी डॉ. जॅक सिक्वेरा यांचा गौरवपूर्ण उल्लेख न करता भाऊसाहेबांचे गुणगान करण्यामागे व्हिएगश यांचा काय हेतू होता असाही सवाल त्यांनी केला.
वार्का येथील युवा नेते वॉरन आलेमाव यांनी व्हिएगश यांच्यावर टीका करताना या भ्रष्ट सरकारची भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी तुलना करणेच गैर आहे असे म्हणत फक्त आपले ईप्सित साध्य करण्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘मस्का’ लावला आहे. आप आणि भाजप हे दोन्ही पक्ष आतून एकच असा आरोप मी यापूर्वी केला होता. कालच्या व्हेंझी व्हिएगश यांच्या वक्तव्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आंबेली बेतुल येथील अँथनी डिसिल्वा यांनीही व्हेंझी व्हिएगशवर टीका करताना त्यांनाही भाजपात जाण्याचे वेध लागले आहेत का असा सवाल केला.
गत तीन वर्षांत भाजप सरकारवर कडाडून टीका करणारे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी अकस्मात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याची स्तुती करण्यास सुरवात केली आहे हे बघून आमची करमणूक होत आहे. त्यामुळे आम्हाला आश्र्चर्य मुळीच वाटलेले नाही किंवा धक्कासुद्धा बसलेला नाही. हे राजकारण आहे हे लोकांनी लक्षात ठेवावे. मात्र, आमदार सांगतात की बाणावलीत विकास झाला हे धांदात खोटे आहे. मुख्यमंत्र्यांनी बाणावली मतदारसंघातील कोणत्या विकासकामांना मान्यता दिली हे आमदारालाच ठाऊक असेल, असे केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यानी आज पत्रकारांना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.