Belgaum: 'हा आमचा रस्ता, तू कोण'? कार पार्किंगवरून गोव्याच्या व्यक्तीवर बेळगावात हल्ला; जमिनीवर पाडून केली मारहाण

Belgaum Crime News: बेळगावमधील मिलिटरी कॅम्प परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून गोव्यातील रहिवाशी मंदार मांजरेकर याच्यावर एका गटाने आज हल्ला करून त्याला जखमी केले.
Goa resident attacked
Goa resident attacked in belgaumDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेळगावमधील मिलिटरी कॅम्प परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून गोव्यातील रहिवाशी मंदार मांजरेकर याच्यावर एका गटाने आज हल्ला करून त्याला जखमी केले.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिलिटरी कॅम्पमधील आर्मी इन्स्टिट्यूटजवळ त्यांनी आपली कार पार्क करताना काही दुचाक्या बाजूला हलविल्या. त्यावेळी तेथे आलेल्या एका महिलेने त्यांच्या गाडीसमोर उभे रहात अडथळा निर्माण केला, तर तिच्या पतीने आक्रमक होत ‘हा रस्ता आमचाच आहे, तू कोण?’ असा प्रश्न विचारला.

Goa resident attacked
Tourist Assault Goa: "गोव्यात पुन्हा कधीच जाणार नाही" शिवीगाळ करून केली मारहाण, पर्यटकानं शेअर केला धक्कादायक अनुभव

यानंतर दोघांनी मांजरेकर यांना शिवीगाळ केली आणि ‘या व्यक्तीने आमच्या दुचाकी हलवून त्या ठिकाणी आपली कार पार्क कशी केली’ असे म्हणत हल्ला चढविला व त्याला जमिनीवर पाडून मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

Goa resident attacked
Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

दरम्यान, या मारहाणीवेळी तेथील उपस्थित काही स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून त्याला वाचवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकारानंतर मांजरेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com