Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Damone Family Fire Case Belagavi: चव्हाट गल्लीतील (ढोर गल्ली) दमोने कुटुंबातील सहा जणांचा बळी गेलेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे.
Damone family six deaths
Damone family fire caseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बेळगाव: चव्हाट गल्लीतील (ढोर गल्ली) दमोने कुटुंबातील सहा जणांचा बळी गेलेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला शॉर्टसर्किट आणि त्यानंतर फ्रीजमध्ये झालेल्या बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, आग लागण्याच्या काही मिनिटे आधी घराजवळ हातात बादली घेऊन आलेली एक संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. यामुळे पोलिसांनी घटनेची नव्याने चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेत दमोने कुटुंबातील गंगा दमोने, प्रिया दमोने, भारती दमोने, शारदा दमोने, गजानन दमोने आणि रोशन दमोने या सहा जणांचा मृत्यू झाला.

Damone family six deaths
Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

या घटनेच्या, १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे १.५८ वाजता एक व्यक्ती हातात बादली घेऊन गजानन दमोने यांच्या घराजवळ आल्याचे दिसते व दोन मिनिटांत तेथून बादलीशिवाय घाईघाईने तेथून निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर सुमारे दोन मिनिटांनी घराला आग लागून ती वेगाने पसरली होती. सुरुवातीला शॉर्टसर्किट व फ्रीजमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

या घटनेच्या सखोल चौकशीसाठी तीन पथकांची स्थापना केली आहे. याठिकाणी आढळून आलेल्या ‘सीसीटीव्ही’चीही माहिती मिळाली असून, त्याचीही पडताळणी सुरू आहे.

- प्रकाश निकम, बेळगाव शहर पोलिस आयुक्त

Damone family six deaths
Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com