भीक मागण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन केले 3 वर्षीय मुलीचे अपहरण; भिकाऱ्याला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 35,000 दंड

Goa Court Decision: अपहरण करुन आरोपीने मुलीला मुंबई, सुरत आणि भोपाळ येथे फिरवले; एक वर्षानंतर रिझवानचा शोध लागला आणि त्याला अटक करण्यात आली.
Beggar jailed for kidnapping child in Madgaon
Kidnapping for begging in Goa leads to 10-year imprisonmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भीक मागण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावरुन तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी भिकारी दोषी सापडला आहे. गोव्यातील बाल न्यायालयाने त्याला दहा वर्षे तुरुंगवास आणि ३५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने बुधवारी आरोपी इंदू रिझवान याला शिक्षा ठोठवली.

आई – वडिलांसोबत मडगाव रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तीन वर्षीय मुलीचे रिझवान याने अपहरण केले. नोव्हेंबर २०१७ रोजी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर ही घटना घडली. मुलीच्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने पालकांनी माहिती दिली.

पालकांनी कोकण रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती मुलीचे अपहरण करुन फरार झाल्याचे दिसून आले.

Beggar jailed for kidnapping child in Madgaon
Betoda Accident: बेतोडा जंक्शनवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; रुग्णालयात नेण्याआधीच सोडला प्राण

मूळ हुबळी, कर्नाटक येथील असणारे हे कुटुंब वारंवार गोव्यात कामाच्या निमित्ताने येत असते. भीकारी रिझवानचा मंगळुरु पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्याने गोव्यात जम बसवला होता. गोव्यातून तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर त्याने मुंबई, सुरत आणि भोपाळ येथे भीक मागण्यासाठी तिला फिरवले.

रेल्वे आणि गोवा पोलिसांची टीम बांद्रा मुंबईत तपास घेण्यासाठी दाखल झाली. तसेच, आरोपी रिझवानचे फोटो देशभरातील पोलिस स्थानकांत पाठविण्यात आले. दरम्यान, एक वर्षानंतर रिझवानचा शोध लागला आणि त्याला अटक करण्यात आली.

भोपाळ येथे रिझवान अपहरण केलेल्या मुलीसह भीक मागत असल्याचे आढळून आले होते. यानंतर रिझवानला अटक करुन मुलीची सुटका करीत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com