Liquor Rates Goa: मद्यप्रेमींसाठी खुशखबर! गोव्यात बिअर आणि वाईनचे दर कमी होणार? येत्या बजेटमध्ये फैसला

Beer And Wine Rates In Goa: गोव्यात सध्या बिअर आणि वाईनवरील मूल्यवर्धित कर २२.५ ट्क्के एवढा आहे.
TTAG is batting for a 10 per cent reduction in VAT on beer and wine
The Travel & Tourism Association of Goa (TTAG) Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दारु देखील स्वस्त मिळते हे आणखी एक कारण पर्यटकांचे येथे येण्यासाठीचे असते. गोवा, बीच आणि दारु हे देशी पर्यटकांसाठी समीकरण ठरलेलं आहे. दरम्यान, गोव्यात बिअर आणि वाईनचे आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

द ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) यांनी बिअर आणि वाईनवरील मूल्यवर्धित करात (VAT) दहा टक्के कपात करण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्याची मागणी असोसिएशनने केलीय. राज्यात सध्या बिअर आणि वाईनवरील मूल्यवर्धित कर २२.५ ट्क्के एवढा आहे.

TTAG is batting for a 10 per cent reduction in VAT on beer and wine
Goa Taxi Meter: गोवा टॅक्सी सेवेबाबत महत्वाची बातमी! भाडे मीटर म्हणून 'ॲप'ला मान्यता; नियमांमध्ये सुधारणा

मूल्यवर्धित करात कपात केल्यास स्थानिक पातळीवरील मद्य खरेदीत वाढ होईल, असा दावा असोसिएशनने केला आहे. राज्यात होणारी लग्न आणि विविध प्रेस कॉनफर्न्ससाठी येणारे गेस्ट परराज्यातून गोव्यात दारु घेऊन येत आहेत. यामुळे स्थानिक गोमंतकीयांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. सध्याच्या नियमानुसार गोव्यात परराज्यातून येणाऱ्यांना केवळ दोनच बोटल घेऊन येण्याची परवानगी आहे, असे द ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनने म्हटले आहे.

TTAG is batting for a 10 per cent reduction in VAT on beer and wine
Porvorim: पर्वरीतील रस्त्याचे डांबरीकरण, गटार कामे त्वरित करा! सविस्तर कृती आराखडा आवश्यक; गोवा खंडपीठाचे निर्देश

यामुळे गोवा सरकार आगामी अर्थसंकल्पात मूल्यवर्धित करात कपात करण्याचा निर्णय घेणार का? तसेच, तसे केल्यास बिअर व वाईनचे दर किती रुपयांपर्यंत कमी होणार? याबाबत मद्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, येत्या अर्थसंकल्पातून याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com