International Women's Day: एक सेल्फी नक्की घ्या!

स्त्रियांना मोकळे होण्यासाठी माध्यमाची गरज आहे
Women's Day
Women's DayDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

येत्या बुधवारी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा केला जाणार आहे. विषय तोच असला तरी सलगता सोडून काही मांडावेसे वाटले. स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी त्यांच्या समस्यांची चर्चा व्हावी, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय महिलादिनाची सुरुवात झाली.

अमेरिकेतल्या कामगार स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी उभारलेल्या लढ्याची उत्पत्ती म्हणजे हा दिवस. आताशा काहीसे दिखाऊ स्वरूप जरी आले असले तरी जवळजवळ 150 वर्षांच्या संघर्षाचा इतिहास यामागे आहे. लिंगभेद, शारीरिक आणि मानसिक शोषण या समस्यांनी ग्रासलेल्या युरोपीय स्त्रियांनी अक्षरशः भांडून, झगडून मतदानाचे हक्क मिळवले. तुलनेत आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्वातंत्र्यावेळी हे हक्क मिळाले.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून मान्य केलेला आहे. या निमित्ताने जगभर वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात. या वर्षी महिलादिनाचा विषय आहे, ‘डिजिटऑल: लिंगसमानतेसाठी अभिनव कल्पना आणि तंत्रज्ञान’. यामध्ये जागतिक स्तरावर वाढत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता, त्यात महिलांचा असलेला अत्यल्प सहभाग आणि त्यासाठी करता येण्याजोगे उपाय, अशा विषयांवर चर्चा होणार आहे.

32 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून, असे समोर आले आहे की इंटरनेट वापरणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्याही 3% टक्के इतकी कमी आहे. या सगळ्यांबरोबर ऑनलाइन हिंसाचाराला 65 टक्के महिला बळी पडलेल्या आहेत, असेही समोर आले आहे. या दिवसाच्या निमित्ताने वरील सगळ्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

आपल्या देशात उत्सवांची कमतरता नाही, त्यामुळे हे सगळे दिवस उत्सवासारखेच साजरे केले जातात. मूळ मुद्यावर, विषयावर फारसे कुणी बोलताना दिसत नाही. महिलांचा डिजिटल जगात प्रवेश म्हणून ‘दिसेल तिला मोबाईल’, अशी स्कीम आली तर आश्चर्य वाटू नये. अर्थात मोबाइल किंवा इंटरनेट ही काही आता ‘स्टेटसबिटस’ची गोष्ट नाही.

रस्त्यावर भाजी विकणाऱ्या असोत किंवा उच्च पदावर काम करणारी महिला असो, मोबाइल वापरण्याचे नावीन्य काही उरले नाही. पण या मोबाइलचा वापर नेमका कशासाठी करतात बरे महिला? घरगुती हिंसाचार कदाचित समजून घेता येईल पण ऑनलाइन हिंसाचार? कसा होतो? कुणाकडून होतो? का होतो? काही कल्पना आहे? मग या आठवड्यात तुमचे मोबाइल याच विषयावर भरून जाऊ देत.

चर्चा होऊ दे आणि उत्तरेही सापडू देत. तुम्हाला काही कळले. तर मला नक्की कळवा. विषय असा आहे, तर मग लेखाचे शीर्षक मी असे का लिहिले, ‘सेल्फी?’ त्याचे असे झाले, राज्यस्तरीय कोकणी नाट्यस्पर्धेत आम्ही एक नाटक यंदा सादर केले. ज्याचे शीर्षक होते ‘सेल्फी’. ही सेल्फी म्हणजे नुसता फोटो नव्हे, तर स्वतः मध्ये निरीक्षण करून आपल्यालाच दिसलेला आपला चेहरा.

Women's Day
Vasco News: मुरगावातील सर्वच रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

हा चेहरा कदाचित सुंदर असेल, विद्रूप असेल किंवा सामान्य असेल. पण तो आपला खरा चेहरा असेल. अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी लिहिलेले हे नाटक. रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये भेटलेल्या पाच महिला, नकळत आपल्या मनातले बोलून जातात आणि त्यातून ऊहापोह होतो स्त्रियांच्या नकळत्या प्रश्नांचा. सामान्य प्रश्‍नापासून वेगळ्या असलेल्या काही गहन अशा विषयांचा.

Women's Day
Illegal Bike Racing : नुवेमधील अवैध बाईक रेसिंगला पोलिसांचा इंगा! दोघा संशयितांना अटक

हे नाटक अनुवादित करताना आणि ते नाट्यस्वरूपात आणताना बऱ्याच गोष्टी अनुभवास आल्या. एक गोष्ट लक्षात आली की, स्त्रियांना गरज आहे एका माध्यमाची जिथे त्या मोकळ्या होऊ शकतात. त्यांच्या डोक्याचा ‘प्रेशर कुकर’ काही प्रमाणात शिट्टी देऊन मोकळा होऊ शकतो. ऐकणारे कान आणि धीर देणारे हात ही प्रत्येक स्त्रीची मूलभूत गरज आहे. इतर देशांत यासाठी तज्ज्ञ असतात.

Women's Day
Intellectual Bankruptcy: बौद्धिक दिवाळखोरीचा परिपाक?

पण आपल्या इथे मात्र ही सोय नाही. स्त्रियांना मोकळे होण्यासाठी माध्यमाची गरज आहे. यातून सध्याच्या घडीचे 25 प्रश्‍न सुटू शकतात, असा माझा दावा आहे. व्हाल का तुम्ही माध्यम स्त्रियांचे मन मोकळे करण्याचे?

या महिलादिनाला आपल्या जवळच्या स्त्रियांना एखादा सुरंगीचा वळेसर, मोगऱ्याची आटी, ओवळांचा सर किंवा अबोलीची फाती भेट द्या. त्यांना बोलण्यासाठी वेळ द्या. त्यांचे ऐका. आणि हो शक्य झाल्यास आई बहिणीवरून कोणतीही शिवी घालू नका. महिलादिन साजरा करण्याची गरजच भासणार नाही. आणि हो एक सेल्फी नक्की घ्या!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com