Bastora: गरोदर महिलेसह पतीला जबरी मारहाण, बस्तोडा प्रकरणातील सूत्रधार अजून फरार; 3 संशयितांच्या जामीनाचा निर्णय ठेवला राखून

Bastora Crime: बस्तोडा येथे ‘रोडरेज’वरुन एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या तिघांनी गोवा खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता.
Court Order
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बस्तोडा येथे ‘रोडरेज’वरुन एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या तिघांच्या अर्जावरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरारी असल्याने जामिनाला पोलिसांच्या सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला.

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पिराझोन-मयडे येथील रंगनाथ शेट्ये (५५), विनोद शेटकर (४७) व कौशल शेट्ये (३२) या तिघांना अटक केली असून इतर संशयित अजूनही फरारी आहेत. संशयितांनी हल्ल्यासाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली.

फिर्यादी याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी संशयितांपैकी तुळशीदास, कार्तिक व रुत्विक अशा तिघांची नावे पोलिसांना दिली आहेत त्यानुसार, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. जखमी महिला ही गरोदर होती त्यामुळे हा हल्ला गंभीर होता.

Court Order
Goa Crime: मुंबईतून ड्रग्ज आणून गोव्यात रेव्ह पार्ट्यांना पुरवायचा, पुण्याच्या तरुणाला अटक, 6.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी अटक केलेले संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिस चौकशीवेळी त्यानी तपासकामात सहाकार्य केले आहे. त्यांची कोठडी संपून न्यायालयीन कोठडीत असल्याने ते पोलिसांसाठी चौकशीसाठी नको आहेत.

Court Order
Goa Crime: 'दरमहा 1लाख खंडणी द्या'! बांधकाम व्यावसायिकाला धमकी; फरार सराईत गुन्हेगार 'टारझन'सह तिघांना अटक

न्यायालयीन कोठडीत ठेवून काहीच उपयोग होणार नाही. ते गोमंतकीय असल्याने फरारी होण्याची शक्यता नाही. त्याना जामीन दिल्यास दिलेल्या शर्थींचे पालन करण्यात येईल. साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन देण्याचा युक्तिवाद करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com