Agriculture: बार्देशात 200 हेक्टरहून अधिक शेती लागवडीखाली; पारंपरिक बियाण्यांचा वापर अधिक

दीड लाख रोपांची विक्री- मिरची, कांदा, हळसांदे पिकांवरही शेतकऱ्यांचा भर
Goa Agriculture | Farm
Goa Agriculture | FarmDanik Gomantak
Published on
Updated on

Agriculture: बार्देशवासीयांचा यंदा शेती व्यवसायाकडे कल वाढलेला दिसतो. यावर्षी तालुक्यात अंदाजित 200 हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन यंदा लागवडीखाली आली. तर दीड लाखांहून अधिक रोपांची विक्री आणि 380 किलोपेक्षा जास्त विविध जातींच्या बियाण्यांची विक्री मौसमात झाली,अशी माहिती कृषी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

कृषी विभागीय कार्यालयाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी मिरची, कांदा, हळसांदे यासारख्या लागवडीवर भर देत, पारंपरिक बियाण्यांचा वापर केला. तसेच संकरीत जातीच्या बियाण्यांचा वापरही केला.

कृषी विभागीय कार्यालयाने आलीया जातीच्या नव्या मिरचीच्या बियाण्यांची लागवड करून शेतकऱ्यांना विक्री केली. त्याशिवाय वांगी, नवलकोल, ब्रोकली, दोडगी, वाल, पडवळ याप्रमाणे संकरीत जातीच्या रोपांचाही यात समावेश होतो.

बार्देश तालुक्यातील सातही मतदारसंघात भाजी, मिरची व कादांच्या लागवडीवर लोकांनी अधिक भर दिलाय. हळदोणा, मयडे, पोंबुर्फा, पर्रा, साळगाव, सांगोल्डा, हणजूण, आसगाव, शिवोली हणजूण या भागात लागवड केली आहे. पर्रा तसेच इतर सभोवतालीच्या भागात कलिंगडाची लागवड लोकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे.

Goa Agriculture | Farm
Artist in Goa: कलाकारांच्या उन्नतीसाठी मदत करणार

संकरीत बियाण्यांचाही वापर

शेतकऱ्यांनी एकाच पिकावर लक्ष केंद्रित न करता मिश्र पिकावर भर दिला. कारण, एखाद्या पिकावर परिणाम झाल्यास दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळवता येईल.

काहींनी भुईमूग, चवळी तसेच मुगाची लागवड केली. तर पारंपरिक बियाण्यांसोबत नव्या संकरीत जातीच्या बियाण्यांचा वापर केला.

कृषी खात्याच्या योजनांचा फायदा होतोय. तर विभागीय कार्यालयातून मिळणारे सहकार्य व योग्य प्रशिक्षणाचाही शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून मुख्य पिकाबरोबरच आंतरपीक घेण्यावर सध्या शेतकरी भर देत आहेत.- प्रकाश गडेकर, शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com