Artist in Goa: कलाकारांच्या उन्नतीसाठी मदत करणार

कलाकारांना सरकारमार्फत आर्थिक सहकार्य देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
Art
Art Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: कलेच्या माध्यमातून गावाचे तसेच राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या कलाकारांना सरकारमार्फत योग्य ते आर्थिक सहकार्य देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

मांद्रे येथील साची राजेश सावंत हिने ओडिसा येथे घेण्यात आलेल्या लिटल मिस इंडिया नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा गौरव करताना ते बोलत होते. नवचेतना युवक संघ पेडणे आणि शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मांद्रे पंचायत सभागृहात साची सावंत यांचा हा गौरव सोहळा झाला.

यावेळी व्यासपीठावर मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत, उपसरपंच तारा हडफडकर, उद्योजक मनोहर तळवणेकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे महादेव गवंडी, सपना राजेश सावंत उपस्थित होते. सुरवातीला मानसी शिरोडकर यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले. तिचे आमदार जीत आरोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

आमदार जीत आरोलकर यांनी पुढे सांगितले, की साची सावंत यांनी ज्या पद्धतीने आपले गावाबरोबरच राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची जी कामगिरी केलेली आहे, त्या कामगिरीची दखल पेडणे तालुक्यातील युवक आणि पत्रकारांनी घेऊन त्यांचा गौरव केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

साची सावंत हिने ज्या पद्धतीने लिटल मिस इंडिया स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावून जे यश संपादित केले आहे त्याबद्दल कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे चर्चा करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी आपले प्रयत्न असतील.

यावेळी पत्रकार निवृत्ती शिरोडकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, उपसरपंच तारा हडफडकर, पुनीत तळवणेकर यांनी साची सावंत हिने मिळविलेल्या यशाबद्दल गौरवोद्‍गार काढले. आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते साची राजेश सावंत हिचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी साची सावंत हिचे आगरवाडा कॅम्प अर्बन सोसायटीचे चेअरमन रवींद्र राऊत, यशश्री नाईक, चंद्रकांत जाधव, शांती किनळेकर, किशोर किनळेकर, पेडण्याच्या नगरसेविका आश्विनी अरविंद पालयेकर, विठ्ठल परब, माधवी गवंडी, सुचिता शिरोडकर, सीताराम गावडे, नारायण कोरगावकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्वेता सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

Art
Amthane Dam: आमठाणे धरणातील जलसाठ्यात जवळपास 3.5 मीटर घट; साठा नियंत्रणावर देणार भर

मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी सांगितले, की साचीने मांद्रेचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्याबद्दल पंचायतीतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय साची दुसऱ्या राज्यात अशी कला सादर करण्यासाठी जाईल, तेव्हा सर्व खर्च मांद्रे पंचायत करेल.

सत्काराला उत्तर देताना साची राजेश सावंत हिने सांगितले, की कलेसाठी अविरतपणे आपल्याला सहकार्य करणारी आपली आई सपना सावंत हिला माझ्या यशाचे सर्व सर्व श्रेय जाते. कलेसाठी सदोदित तीच आपली प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com