Bardez News : ‘बोडगेश्वर’ जवळच्या रस्त्यांची दैनावस्था; खड्डे त्वरित बुजविण्याची वाहनचालकांची मागणी

Bardez News : हा रस्ता त्वरित दुरुस्ती करण्याची मागणीही वाहन चालकांतर्फे करण्यात येत आहे.
Bardez
Bardez Dainik Gomantak

Bardez News :

बार्देश, म्हापसा बोडगेश्वर मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून यंदाच्या पहिल्या पावसातच रस्ता उखडला आहे. या रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविणे कठीण होत आहे.

हा रस्ता त्वरित दुरुस्ती करण्याची मागणीही वाहन चालकांतर्फे करण्यात येत आहे.

हा रस्ता व्यवस्थित केला नसल्यामुळे प्रत्येकवर्षी या रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाळ्यात हे खड्डे अधिक मोठे होतात, त्यामुळे हा रस्ता नेहमीच वाहतुकीस धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या मधोमध अनेक खड्डे पडले असून गेल्या पंधरा दिवसात या खड्यामध्ये पाणी साचत असून खड्ड्यांचा आकार वाढत आहे.

त्यामुळे वाहन चालकांना यामार्गावरून वाहन हाकणे कठीण जाते, असे असतानाही म्हापसा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहन चालकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Bardez
Goa Top News: पेडण्यात संरक्षक भिंत कोसळली, पावसाची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

याबाबत एक वाहन चालक दीपक लाड म्हणाले, म्हापसामार्गे कळंगुट व पुन्हा त्याचमार्गे म्हापशाला येताना या मार्गावरून दुचाकी चालवणे, म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामार्गांवर पडलेल्या खड्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहने कशी चालवावी, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. या रस्त्यावरून ज्यावेळी मोठी चारचाकी वाहने ये-जा करतात, त्यावेळी या खड्यामध्ये साचून राहिलेले पाणी बाजूने जाणाऱ्या दुचाकी व पदचाऱ्यांवर उसळते. यात त्याचे कपडे खराब होत आहेत.

Bardez
Goa Inquisition: गोव्यात शालेय अभ्यासक्रमात 'इन्क्विझिशन'चा इतिहास समाविष्ट करा; हिंदू जनजागृती समिती

वाहतूक कोंडी

बोगेडश्वर मंदिराजवळच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होत आहे. खड्ड्यामुळे वाहन सावकाश चालवावी लागतात, शिवाय मोठ्या वाहनांमुळे चिखल, माती दुचाकीचालकांवर उडत असते. त्यामुळे नेहमीच या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांना वेळेत ये-जा करता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी हे खड्डे त्वरित बुजवावे, अशी विद्यार्थी वर्गांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com