Bardez News : हॉटेलमधील ‘अनैतिकते’वर नियंत्रण ठेवा; पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांचा इशारा

Bardez News : म्हापशात हॉटेल मालकांसोबत बैठक
Bardez
BardezDainik Gomantak

Bardez News :

बार्देश, राज्यात विविध गुन्हेगारीच्या घटना घडतात. त्यावेळी गुन्हेगार हॉटेलांमध्ये आसरा घेतात. तसेच अनेक अल्पवयीन युवतीही घरातून पळून येऊन हॉटेलमध्ये थांबतात. त्यावेळी काही अनुचित घटना घडल्यास त्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण होते.

त्यासाठी हॉटेल मालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी केले.

म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असलेल्या हॉटेलमालकांची बुधवार, १२ रोजी दुपारी म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अनेक हॉटेलपैकी सुमारे २३ हॉटेल मालक पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी बोलाविलेल्या बैठकीला हजर होते. यावेळी उपस्थित असलेल्या हॉटेलमालकांनी त्यांना येत असलेल्या अडचणी निरीक्षकांना सांगितल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिले.

Bardez
Goa Police : मद्यपी चालक पोलिसांच्या रडारवर; तीन दिवसांत १५० प्रकरणे नोंद

यावेळी निरीक्षक पालेकर यांनी परराज्यातून गोव्यातील हॉटेलमध्ये पर्यटक म्हणून युवा-युवती, प्रेमी युगुल येतात. बार्देश तालुक्यातील हॉटेलमध्ये त्यांचा जास्त सुळसुळाट आहेच, त्याचबरोबर म्हापसा शहरातील आणि म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असलेल्या हॉटेलमध्येही अशी प्रेमी युगुले येत असल्याचा संशय वक्त केला.

त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी अशाच दोन अल्पवयीन युवती नाहीशा झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. तर काही हॉटेलमध्ये आपली वयोमर्यादा वाढवून वास्तव्य करून हॉटेलमालकांना फसवून हॉटेलची खोली भाड्याने घेतात आणि अनेक गैरव्यवहार करतात. आपल्या राज्यातून लोकांना लुटून येथे येऊन अनेक गुन्हेगार परिसरातील हॉटेलचा आसरा घेतात. येथील पर्यटकांना लुटतात आणि पळून जातात. यावरही हॉटेल मालकांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पालेकर यांनी केली.

माहिती देण्याचे आदेश

उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील हॉटेल मालकांची बैठक घेऊन त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले. वारंवार हॉटेलमालकांकडून माहिती मिळावी, असे आदेश त्यांना देण्यास सांगितले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आल्याची माहिती निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

Bardez
Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

अन्यथा कारवाई करणार!

युवती व महिलांना हॉटेलमध्ये कामाला ठेवण्यापूर्वी त्यांची योग्य ती चौकशी करून पूर्ण माहिती घ्यावी. पोलिसांना ती माहिती द्यावी म्हणजे काही विपरीत घडल्यास शोधकार्य करण्यास सोपे जाईल. तसे न केल्यास पोलिसांना हॉटेल मालकांविरोधात कारवाई करावी लागणार, असे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी बजावले.

प्रत्येक हॉटेलात सीसीटीव्ही असावेत तसेच इतर यंत्रणा असावी, वीज २४ तास मिळावी, पोलिस स्थानकांकडून प्रत्येक हॉटेलवर अधूनमधून पोलिस कॉन्स्टेबलची फेरी असेल. पोलिसांकडून हॉटेलवाल्यांसाठी एक व्हाॅट्सअप ग्रुप तयार केला जाईल. त्यात म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेलमालकांना सामावून घेतले जाईल.

- निखिल पालेकर, पोलिस निरीक्षक, म्हापसा पोलिस स्थानक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com