पणजी, राज्यात रात्रीच्यावेळी वाढत्या रस्ता अपघातांमुळे वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात धडक मोहीम सुरू केली असली तरी मद्यपी चालकांचे प्रमाण कमी झालेले नाही.
गेल्या तीन दिवसांत १५० मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. यावर्षी आतापर्यंत (१ जानेवारी ते ९ जूनपर्यंत) २,३१८ मद्यपी चालकांची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यातील २ हजारांहून अधिक जणांच्या परवाना निलंबनासाठी शिफारस करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात वेर्णा येथे एका बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून चार निष्पाप कामगारांचा बळी घेतला होता. त्याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी आता रात्रीच्यावेळी चारचाकी वाहनांच्या चालकांची अल्कोमीटरने तपासणी सुरू केली आहे. वाहतूक विभागाने मागील तीन आठवड्यांत दर शुक्रवार ते रविवार रात्री ८ ते ११ वा.दरम्यान मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे.
या मोहिमेअंतर्गत ७ जून ते ९ जून दरम्यानच्या काळात तब्बल १५० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १ जानेवारी ते २ जून २०२४ दरम्यान २,३१८ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे तर त्याच कालावधीत २०२३ मध्ये ५३५ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती.
वाहतूक पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयाचे वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सुदेश नार्वेकर आणि दक्षिण गोवा वाहतूक उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वाहतूक विभागाने ही विशेष मोहीम राबवली.
राज्यातील विविध ठिकाणी गस्ती वाढवून तसेच नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तीन दिवस केलेल्या तपासणीत ५० मद्यपी चालकांवर कारवाई केली. त्यात फोंडा वाहतूक विभागाने सर्वाधिक १७ मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ म्हापसा पोलिसांनी १४ जणांवर कारवाई केली.
वाहतूक पोलिस मद्यपी चालक
पणजी ११
पर्वरी ११
म्हापसा १४
कळंगुट ११
हणजूण ६
डिचोली ९
मोपा विमानतळ ७
पेडणे १२
वाहतूक पोलिस मद्यपी चालक
मडगाव १०
फोंडा १७
वास्को १३
कोलवा ३
केपे ५
कुडचडे १
काणकोण १२
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.