Anjuna Hotels Sealed: ..अधिकारी पोचले, तरी सुरु होती पार्टी! हणजुणेत कारवाई; 2 हॉटेलना ठोकले टाळे

Anjuna Hotels Sealed: बार्देश तालुका प्रशासनाने गुरुवारी (ता. ५) सायंकाळी हणजूण–वागातोर परिसरातील दोन नामांकित नाईट क्लबवर कडक कारवाई केली.
Anjuna Hotels Sealed
Anjuna Hotels SealedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hotel Raid : उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बार्देश तालुका प्रशासनाने गुरुवारी (ता. ५) सायंकाळी हणजूण–वागातोर परिसरातील दोन नामांकित नाईट क्लबवर कडक कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात हिल टॉप बार ॲण्ड रेस्टॉरंट तसेच सालुद किचन ॲण्ड लाउंज या आस्थापना सील करण्यात आल्या.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) या दोन्ही ठिकाणांना दिलेली परवानगी रद्द करत दोन महिन्यांसाठी कामकाज निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई अमलात आणण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महसूल, प्रदूषण विभाग आणि पोलिस यांचे संयुक्त पथक वागातोर येथे दाखल झाले. कारवाईदरम्यान एका क्लबमध्ये जोरात पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. तत्काळ ती पार्टी थांबविण्यात आली आणि उपस्थित ग्राहकांना बाहेर काढल्यानंतर जागा सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Anjuna Hotels Sealed
ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नाईट क्लबकडून वारंवार ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जात होती. स्थानिक नागरिकांकडून तसेच पर्यावरणप्रेमी संघटनांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करत नियमभंग सिद्ध झाल्याने कठोर निर्णय घेतला.

Anjuna Hotels Sealed
Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर भविष्यातही अशीच कारवाई केली जाईल. ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com