Online Scam: सोशल मीडियावरून ओळख वाढवली, गुंतवणुकीच्या नावे घातला 20 लाखांचा गंडा; केरळच्या तरुणाला अटक

Goa Crime News: बार्देश येथील एका नागरिकाची तब्बल २०.२३ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गोवा सायबर क्राईम पोलिसांनी केरळमधील २१ वर्षीय आदर्श के. ए. याला अटक केली आहे.
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ऑनलाइन गुंतवणुकीतून लाभाचे आमिष दाखवून बार्देश येथील एका नागरिकाची तब्बल २०.२३ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गोवा सायबर क्राईम पोलिसांनी केरळमधील २१ वर्षीय आदर्श के. ए. याला अटक केली आहे. संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) सह कलम ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६-डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने बार्देश तालुक्यातील पीडित व्यक्तीशी सोशल मीडियावरून संपर्क साधला. टेलिग्रामवरील ‘५०५९ एबीआरडीएन टास्क ग्रुप’ या गटात त्याला सामील करून घेण्यात आले आणि दोन आयडीवरून ‘ऑनलाइन टास्क करून भरघोस परतावा मिळेल’, असे आमिष दाखवण्यात आले.

Arrest
Education Recruitment Scam: शिक्षण खात्यांत नोकर भरती प्रक्रियेंत घोटाळो, गोवा फॉरवर्डचो आरोप; Watch Video

त्यानुसार पीडित व्यक्तीने विविध बँक खात्यांमध्ये एकूण २० लाख २३ हजार रुपये जमा केले. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर सखोल तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषणानंतर केरळमधील त्रिशूर येथील एका बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळले.

Arrest
Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक यशिचा सांकवाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश पाळणी व सचिन नाईक यांनी केरळला जाऊन आरोपीस अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.व्ही. श्रीदेवी आणि महिला पोलीस निरीक्षक अनुश्का पै बिर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असून पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रॅकेटच्या सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे देखील पोलिसांनी कळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com