Goa Waterfalls: धबधब्यांवर जाण्यास बंदी घालणे चुकीचे, गोव्याबाबत चुकीचा संदेश जाईल; पर्यटनमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

Goa Tourism Minister Rohan Khaunte: आता पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी वन खात्याच्या आदेशावर राज्याच्या पर्यटन खात्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
Goa Tourism Minister Rohan Khaunte
Goa Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak

Goa Waterfalls: पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देतात. गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाळ्यामध्ये धबधबे आणि पाणवठ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात वनक्षेत्रातील धबधबे तसेच इतर पाणथळ जागी जाण्यास किंवा पोहण्यास वन खात्याने आदेश काढून मज्जाव केला होता.

वन खात्याचा हा आदेश राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चिला गेला. पर्यटकांना अशाप्रकारचा मज्जाव केल्यास त्याचा मोठा फटका बसेल असे अनेकांनी सांगितले. याचदरम्यान, आता पर्यटनमंत्री रोहन खवंटे (Rohan Khaunte) यांनी वन खात्याच्या आदेशावर राज्याच्या पर्यटन खात्याची भूमिका स्पष्ट केली आहे. धबधब्यांवर जाण्यास बंदी घालणे चुकीचे असल्याचे खवंटे म्हणाले.

Goa Tourism Minister Rohan Khaunte
Goa Waterfalls And Rivers: धबधब्यांवर जाल, तर लाखाचा दंड अन्‌ अटक; गोवा वन खात्याचा आदेश

मंत्रिमहोदय म्हणाले की, ‘’पर्यटन खात्याबरोबर कसलीच चर्चा न करता धबधब्यांवर जाण्यास बंदी घालणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या निर्णायांमुळे पर्यटनाला हे मारक ठरु शकते. खाण व्यवसायानंतर पर्यटनातून गोव्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळतो. वन आणि पर्यटन खात्यांमध्ये समन्वय हवा. अशा प्रकारची बंदी घातल्यास पर्यटकांमध्ये गोव्याबाबत चुकीचा संदेश जाईल. कुणीही उठून अशाप्रकारची बंदी घालू शकत नाही.’’

जे धबधबे वर्षा पर्यटनासाठी सुरक्षीत आहेत त्या धबधब्यांवरील बंदी हटवू. पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी धबधब्यांवरील सरसकट बंदीला आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले.

दरम्यान, आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वन खात्याने आपल्या आदेशात म्हटले होते. एवढेच नाहीतर प्रसंगी अटक होऊ शकते असेही स्पष्ट केले होते. याशिवाय, एक लाख रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो, अशी माहिती उपवनसंरक्षक आनंद जाधव यांनी दिली होती.

Goa Tourism Minister Rohan Khaunte
Waterfalls In Goa: टेन्शन नको काळजी घ्या! गोव्यातील 14 धबधबे सर्वांसाठी खुले, ही घ्या यादी

मुख्य वन्यजीव वॉर्डनने नुकत्याच जारी केलेल्या आदेशामध्ये पावसाळ्यात संरक्षित वनक्षेत्रातील धबधबे तसेच इतर पाणथळ जागी जाण्यास किंवा पोहण्यास मज्जाव करण्यात आला होता. खरे तर, गोवा (Goa) हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून पावसाळ्यात येथील निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलते.

मॉन्सून नियमितपणे गतिमान झाल्यामुळे नद्या आणि जंगलातील धबधब्यांच्या पाण्याच्या पातळीत तसेच प्रवाहातही अचानक वाढ होत आहे. अनेकदा जलप्रवाहांमध्ये उतरलेले लोक वाहून जाण्याचे प्रकारही घडले. हाच धोका लक्षात घेऊन वन खात्याने आदेश काढून धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती. मात्र आता पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनी वनखात्याच्या निर्णयावर आपल्या खात्याची भूमिका स्पष्ट केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com