Suchana Seth CEO: लाखो रुपयांच्या पोटगीसाठी आईने घेतला लेकाचा जीव; नवऱ्याची भेट होऊ नये म्हणून आली होती गोव्यात

Goa Crime News: सुचनाला तिच्या पतीकडून लाखो रुपयांची पोटगी हवी होती.
 Suchana Seth CEO
Suchana Seth CEODainik Gomantak
Published on
Updated on

Suchana Seth CEO: गोव्यातून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी आली अन् सर्वांना चकीत केले. एका आईने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. यातच आता, हत्येचा आरोप असलेली आई सुचना सेठबद्दल नवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. आता बातमी अशी आहे की, सुचनाला तिच्या पतीकडून लाखो रुपयांची पोटगी हवी होती. आपल्या पतीला आपल्या मुलाला भेटू न देण्याच्या हव्यासापोटी तिने गोव्यात जाऊन तिथे आपल्या निष्पाप मुलाची हत्या केल्याचे बोलले जात आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरु असून आरोपी सुचनाला 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुचनाला पती व्यंकटरमनकडून दरमहा अडीच लाख रुपयांची पोटगी हवी होती. पतीचे वार्षिक उत्पन्न एक कोटींहून अधिक असल्याचा दावा तिने केला होता. व्यंकटरमनने आपला शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. या संदर्भात त्याने व्हॉट्सअॅप मेसेज आणि फोटोही न्यायालयात सादर केल्याचे वृत्त आहे.

 Suchana Seth CEO
Goa Crime News: 'त्या' मातेच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता

हत्येवेळी पती कुठे होता?

उत्तर गोव्यातील एका अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी व्यंकटरमन इंडोनेशियामध्ये होता, असे सांगण्यात येत आहे. त्याने सुचनाकडून करण्यात आलेले शारीरिक छळाचे आरोपही फेटाळून लावले आहेत. न्यायालयाने सुचनाला त्याच्या घरी जाण्यास किंवा त्याच्याशी बोलण्यास बंदी घातली होती. मात्र, न्यायालयाने व्यंकटरमनला रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, 2010 मध्ये व्यंकटरमण आणि सुचना यांनी प्रेमविवाह केला होता. ते दोघे बंगळुरुमध्ये राहत होते. दोघांनाही 2019 मध्ये मुलगा झाला होता. मात्र, त्यादरम्यान करोनाचा फटका बसला आणि दोघांमध्ये मतभेद सुरु झाले. दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नसला तरी यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुलाचा ताबा आईला दिला होता.

 Suchana Seth CEO
Nessai Crime News : झारखंडच्या मजुराचा नेसाय येथे खून; गळ्यावर, चेहऱ्यावर वार

दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, रविवारी व्यंकटरमनची भेट आपल्या मुलाशी होऊ नये असे सुचनाला वाटत होते. यामुळे तिने गोव्याला जाण्याचा बेत आखला होता. रिपोर्टनुसार, इंडोनेशियाला रवाना झालेल्या व्यंकटरमनने सुचनाला व्हिडिओ कॉल केला आणि आपल्या मुलाशी बोलला. त्यानंतरच रागाच्या भरात सुचनाने आपल्या मुलाची हत्या केली.

बॅगमध्ये मृतदेह सापडला

सुचनाला मंगळवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली. तसेच, तिच्यासोबत असलेल्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. वास्तविक, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोली तपासली असता त्यांना रक्ताचे डाग आढळून आले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी माहिती घेऊन कर्नाटकला जाणाऱ्या चालकाशी संपर्क साधला आणि चतुराईने त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com