Casino
CasinoDainik Gomantak

दरोडेखोरांचा 'कॅसिनो प्लॅन' फसला! बंगळूरमध्ये चोरी, आंध्र-उत्तर प्रदेशमार्गे गाठणार होते गोवा, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

Bangalore Atm Robbery: कर्नाटकातील सिद्धापूर पोलिसांनी बंगळूर न्यायालयात सादर केलेल्या सुमारे १३२८ पानी आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
Published on

पणजी: बंगळूर शहरात गतवर्षी ७.११ कोटी रुपयांच्या एटीएम दरोड्याचा कट रचणाऱ्या नऊ जणांच्या टोळीचे अंतिम लक्ष्य गोव्यात जाऊन कॅसिनोमध्ये उधळपट्टी करणे हेच होते, अशी धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे. कर्नाटकातील सिद्धापूर पोलिसांनी बंगळूर न्यायालयात सादर केलेल्या सुमारे १३२८ पानी आरोपपत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.

दक्षिण विभागाचे पोलिस उपायुक्त लोकेश जगलास यांच्या म्हणण्यानुसार, या कटाचा सूत्रधार झेवियर हा सीएमएस कंपनीतील कर्मचारी असून त्याला कंपनीची संपूर्ण कार्यपद्धती माहिती होती. पळून जाण्यासाठी टोळीने कर्नाटकातून आंध्र प्रदेशात प्रवेश करून तेथून उत्तर प्रदेशमार्गे किंवा थेट गोव्यात जाण्याचा मार्ग आखला होता.

Casino
Goa Crime: अबब! गोव्यात पकडले 5.91 कोटींचे ड्रग्ज; 5 विदेशींसह एकूण 27 जणांना अटक

गोव्यात पोहोचून कॅसिनोमध्ये पैसे उधळण्याचा त्यांचा बेत होता. काही आरोपींनी जुगारामुळे झालेले तोटे भरून काढण्याचाही विचार केला होता, असे आरोपपत्रात नमूद आहे. जयनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि त्यांच्या पथकाने शास्त्रीय पद्धतीने तपास पूर्ण केला. या टोळीविरुद्ध दरोडा, बेकायदेशीर अडवणूक, बेकायदेशीर कैद, पुरावे नष्ट करणे, गुन्हेगारी कट, धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Casino
Cyber Crime: "पैसे ट्रान्सफर कर, अन्यथा..." 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देत साखळीतील महिलेला 1.05 लाखांचा गंडा

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी टोळीतील सदस्यांनी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून दक्षिण बेंगळुरूमधील सीएमएस इन्फो सिस्टिम्सच्या वाहनाला अडवले. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांनी ७.११ कोटी रुपयांची रोकड लुटली. पोलिसांनी अवघ्या ५४ तासांत गुन्हा उघडकीस आणत बहुतांश रक्कम जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com