सासष्टी: छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतीयांना स्वराज्याची संकल्पना समजली नसती.त्यांनी स्वराज्याची संकल्पना तेव्हा लोकांच्या मनात बिंबवताना सर्वधर्माला पुरक अशा विचारांचा प्रसार केला, असे इतिहासाचे गाढे अभ्यासक, वक्ते अॅड. शिवाजी देसाई यांनी व्याख्यानात सांगितले. मडगावच्या गोमंत विद्या निकेतनतर्फे तिथीनुसार आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.तेव्हा शिवरायांकडे जे राजकारणी होते त्यांच्याकडे त्यागी वृत्ती होती जी आजच्या राजकारण्यांमध्ये आढळत नाही, असेही ते म्हणाले. (Advocate Shivaji Desai News)
शिवाजी राजे म्हणजे चारित्र्याची ताकद होती. चारित्र्याची शक्ती उभी करण्यासाठी जो संयम पाहिजे तो सद्या आढळत नाही, असे अॅड देसाई यानी "भूमंडळी शिव छत्रपती" या विषयावर बोलताना सांगितले. सुरवातीला मेहक, दिमशा, मोक्षा महेश तिरोडकर, सुगंधी, ज्ञानदा मधुसुदन नाईक, रुपा, युतीका शशीधर पाटील व निलिमा नाईक यांनी शिवरायांचा पाळणा सादर केला.
जनार्दन वेर्लेकर यांनी स्वागत केले. नितीश नायक यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.