Banastarim Bridge Accident : नशेत तिघांच्या बळी घेणाऱ्या चालकाला अखेर न्यायालयाने 'जागा' दाखवली, अर्ज फेटाळला

मद्यप्राशन करून बेदरकारपणे चालवली गाडी, अपघातात तिघांचा मृत्यू
Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested
Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणास्तरी येथे झालेल्या अपघातातील मर्सिडीजचा चालक परेश सावर्डेकर याला फोंडा येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने जामिन नाकारला. चालक परेश सावर्डेकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यधुंद अवस्‍थेत बाणस्तारी येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनॉय सावर्डेकर (48) याला पहाटे चारच्या सुमारास म्हार्दोळ पोलिसांनी मिरामार-पणजी येथून अटक केली होती. त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.

Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested
Banastarim Bridge Accident: तिघांचा जीव घेणारा चालक होता नशेत, अटक टाळण्यासाठी रचला होता बनाव

पार्टी करून येताना त्याच्या मर्सिडीझ कारने (जीए०७ के ७३११) चुकीच्या मार्गाने भरधाव येऊन एकूण पाच वाहनांना धडक दिली होती. त्यात तिघांचा बळी गेला होता. अन्य तिघे गंभीर अवस्‍थेत गोमेकॉत उपचार घेत आहेत.

जोडरस्त्यावरून पुलाजवळ मुख्य रस्त्यावर घेताना या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने ती दुसऱ्या बाजूला गेली. त्यामुळे फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींसह तीन कारना धडक देऊन कार खांबाला आदळली व पुलाच्या पदपथावर अडकली. अन्यथा ती सरळ नदीच्या पात्रात कोसळली असती, असे प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी सांगितले.

अपघातास कारणीभूत ठरलेल्‍या कारगाडीत परेश सावर्डेकर, त्याची पत्नी मेघना सावर्डेकर व अन्य तीन मुले होती. मात्र अपघातानंतर आपल्या पतीला वाचवण्यासाठी मेघना सावर्डेकर ही चालकाच्या सीटवर बसली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अपघातानंतर सावर्डेकर कुटुंबीयांनी घटनास्थळाहून पळ काढला. अपघाताचा पंचनामा म्हार्दोळ पोलिसांनी केला असून पोलिस निरीक्षक मोहन गावडे पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com