
Goa Dental College and Hospital
पणजी: बांबोळी येथील दंत महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीच्या बाथरूमच्या खिडकीतून चित्रीकरण केल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाच्या सचिवांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ मे २०२५ रोजी रात्री ९.४५ ते १० च्या सुमारास या महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या कंपाउंडमध्ये आत घुसला.
त्यानंतर त्याने तळमजल्यावर असलेल्या खोलीच्या बाथरूमच्या खिडकीतून आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनींचे मोबाईलने दुष्ट हेतूने चित्रीकरण तसेच आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीला कोणी तरी खिडकीत असल्याचा अंदाज आला. तिने आरडाओरड केली असताना हा विद्यार्थी कंपाउंडवरून उडी मारून पळाला.
तो पळताना वसतिगृहातील काही विद्यार्थिंनींनी त्याला पाहिले. या घटनेची माहिती वसतिगृह सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्यावर यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने केलेला गुन्हा विद्यार्थिंनीच्या सुरक्षिततेचे तसेच सभ्यतेचे उल्लंघन केले असल्याने पोलिसांनी गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.